Rohit Sharma : रोहित मोठ्या मनाचा! हार्दिकसाठी सोडणार MI ची कॅप्टन्सी... काय म्हणतोय आर. अश्विन?

Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincy
Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincyesakal
Updated on

Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincy : जेव्हापासून गुजरात टायटन्सचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा स्वग्रही मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड ऑफ होऊन आला आहे तेव्हापासून तो रोहित शर्माची कॅप्टन्सी काढूण घेणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन आयपीएल ट्रॉफी विजेते कर्णधार एकाच संघात असल्यावर संघर्ष अटळ असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत.

मात्र भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) याबबत वेगळे मत व्यक्त केलं. तो म्हणाला की भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. तो हे ट्राजिशन चांगल्या प्रकारे हाताळेल. त्यामुळे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार होणार असं त्यानं गृहीत धरायला हरकत नाही असंही अश्विन म्हणाला.

Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincy
Sanju Samson T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा झाली अन् संजू सॅमसनच्या टी 20 वर्ल्डकप खेळण्याच्या आशेवर फिरलं पाणी?

आर. अश्विन माजी क्रिकेटपटू एस बद्रिनाथसोबत यूट्यूबवरील चर्चेत म्हणाला की, 'रोहित शर्मा हा मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. तो एक चांगला व्यक्ती आणि चांगला लीडर देखील आहे. जर हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार घोषित केलं गेलं तर तो ही परिस्थिती अत्यंत ग्रेसफुली हाताळेल.'

'आघाडीचे चार ते पाच संघ सोडले तर आयपीएल इतिहासात इतर संघांमध्ये रिलीज केलेलेच खेळाडू असतात. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी असं कधी केलेलं नाही. जितकं मी हार्दिक पांड्याला ओळखतो. मला ही चाल एक मैलाचा दगड ठरेल असं वाटतंय.'

अश्विनला त्याच्या निवृत्तीबाबत विचारलं असता तो म्हणाला की ज्या दिवशी मला प्रेरणा मिळायची बंद होईल त्या दिवशी मी निवृत्ती घेईन.

अश्विन पुढे म्हणाला की, 'मी याबबत डिप्लोमेटिक नाही. 2019 पासून मी आयुष्यात स्वतःला एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी पाहिलं आहे. मी मानसिक स्वास्थ्यासाठी मदत देखील घेतली आहे. यावेळी मला समजलं की तुम्हाला कोणत्याही स्थितीसाठी तयार रहायला हवं.'

Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincy
India Squad For SA vs IND ODI : दमदार कामगिरीचं बक्षीस! दक्षिण अफ्रिकेत रिंकूसह अजून दोन फलंदाजांना वनडे पदार्पण करण्याची संधी

'मी गेल्या पाच वर्षापासून क्रिकेटनंतरच्या आयुष्याची तयारी करत आहे. मात्र मी माझ्या क्रिकेटवर देखील खूप काम करत आहे. मी फलंदाजीत योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. मी युएसएमध्ये जाऊन बेसबॉलचा देखील सराव केला आहे.'

'ज्यादिवशी मला प्रेरणा मिळायचं बंद होईल. मला सकाळी उठून गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याचा कंटाळा येईल त्यादिवशी मला समजेल की आता हे सगळं संपलं आहे. त्यावेळी मी त्वरित सगळं सोडून देईन. सर्वांचे आभार मानणार अन् आयुष्याच्या पुढच्या टप्प्याकडे वळणार.'

निवृत्तीनंतर काय करणार याबाबत विचारलं असता अश्विनने त्याबाबत अजून काही आखणी केलेली नाही असं सांगितलं. तो म्हणाला की मी क्रिकेटव्यतिरिक्त इतर काहीतरी करेन. मात्र तरी देखील मी क्रिकेट पाहणं सोडणार नाही. मी क्रिकेटसाठी काहीतरी करेन आणि त्याच्या बाहेरचं देखील काहीतरी नक्कीच करेन.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.