R. Ashwin | 'आम्हाला वाटलं हे विमान काही खाली उतरत नाही'

Ravichandran Ashwin Share Scary Experience Of Flight
Ravichandran Ashwin Share Scary Experience Of Flightesakal
Updated on

भारतासाठी ऑस्ट्रेलियाचा 2020 - 21 चा दौरा ऐतिहासिक होता. या दौऱ्यावर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं होतं. पहिल्या अॅडिलेड कसोटीत भारताचा संघ 36 धावात ऑल आऊट झाला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने जबरदस्त भरारी घेतली होती. भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव करत ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. (Ravichandran Ashwin Share Scary Experience Of Flight in 2022-21 Australia Tour)

Ravichandran Ashwin Share Scary Experience Of Flight
पदार्पणाची कॅप घालताना वाटलं वडील आता इथं हवे होते...

या मालिका विजयात रविचंद्रन अश्विनने देखील मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, अश्विनने वूटवरील 'बंदे में था दम' या वेब सिरीजच्या लाँचिंगदरम्यान, या थरारक मालिकेतील एक थरारक किस्सा सांगितला. अश्विन माध्यमांशी बोलताना म्हणाला की, 'सिडनीवरून आमच्या विमानाने टेक ऑफ केले. मात्र टेक ऑफ केल्यानंतर विमान एका वादळात सापडले. तो खूप भीतीदायक क्षण होता. मला असे वाटले की आता हे विमान काही लँड होणारच नाही.' अश्विनने या भीतीदायक विमान प्रवासाबद्दल ट्विट देखील केले होते.

Ravichandran Ashwin Share Scary Experience Of Flight
युवराज टीम इंडियाचा कर्णधार झाला असता तर.... काय म्हणतोय हरभजन?

रविचंद्रन अश्विन 2020 - 21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये मोहम्मद सिराजनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. सिडनी कसोटी वाचवण्यात अश्विनने मोठी भुमिका बजावली होती. तो दुखापतींशीही झुंजत होता. तरी देखील हनुमा विहारी सोबत त्याने कसोटीच्या शेवटच्या दिवशी नाबाद भागीदारी रचत सामना अनिर्णित राखला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.