बंगळुरू : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) एका पाठोपाठ एक विक्रम मागे टाकत चालला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या (India vs Sri Lanka) तिसऱ्या दिवशी आर अश्वनने धनंजय डी सिल्वाला अवघ्या 4 धावांवर बाद केले. अश्विनची ही 440 वी कसोटी विकेट ठरली. त्यामुळे अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 8 व्या स्थानावर पोहचला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) मागे टाकले.
डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये 439 विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनने डेल स्टेनची बरोबरी केली होती. त्यानंतर अश्विनने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात धनंजया डी सिल्वाला बाद करत आपला 440 वा मोहरा टिपला. आता अश्विन कसोटी क्रिकेट मधाला सर्वाधिक विकेट (Highest Wicket Taker in Test Cricket) घेणाऱ्यांच्या यादीत आठव्या स्थानावर पोहचला आहे.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यातीत पहिल्या तीन क्रमकांवर मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708), जेम्स अँडरसन (640) यांचा नंबर लागतो. अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्य स्थानावर आहे. या यादीत अनिल कुंबळे 619 विकेट घेऊन अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने कपिल देव यांच्या 434 विकेट्सचा विक्रम मोडला. यानंतर तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला.
दरम्यान, भारताने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीवर तिसऱ्याच दिवशी चागंली पकड मिळवली आहे. आतापर्यंत भारताने श्रीलंकेची अवस्था 6 बाद 200 अशी केली असून भारताला विजयासाठी 4 विकेट्सची तर श्रीलंकेला विजयासाठी 243 धावांची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.