Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा हा माझ्यासाठी बुस्टर डोस; रिवाबाने सांगितला शूजचा किस्सा

Ravindra Jadaja Wife Rivaba
Ravindra Jadaja Wife Rivabaesakal
Updated on

Ravindra Jadaja Wife Rivaba : गुजरातमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा खूप चर्चेत आला आहे. रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. शनिवारी एका निवडणूक प्रचार सभेवेळी रिवाबाने रविंद्र जडेजा माझ्यासाठी एक बूस्टर डोस असल्याचे सांगितले. यावेळी तिने रविंद्र जडेजाबरोबरचा एक किस्सा देखील सांगितला.

Ravindra Jadaja Wife Rivaba
Dinesh Karthik : टी 20 संघात आत - बाहेर करणाऱ्या पंतबद्दल कार्तिकचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

जामनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबाने प्रचारसभेदरम्यान रविंद्र जडेजाचे आपल्याला खूप समर्थन मिळते असे सांगितले. यावेळी तिने एक शूजचा किस्सा सांगितला. ती म्हणाला की, 'यापूर्वी मी लेस असलेले शूज घालून प्रचार करत होते. मी माझ्या पतीला सांगितले की मला आरामदायक शूज पाहिजे. त्यावेळी त्यांनी मला नवीन शूज थेट प्रचार सभेत आणून दिले. हे अनेक उदाहरणामधील एक उदाहरण आहे.'

रिवाबा पुढे म्हणाले की, 'लग्नव्यवस्थेचा एक आपलाच अर्थ असतो. पती पत्नीने एकमेकांसाठी उभे राहिले पाहिजे आणि एकमेकांना साथ दिली पाहिजे. ज्यावेळी मी निवडणूक अर्ज भरण्यासाठी गेले त्यावेळी माझे पती माझ्यासोबत होते हा क्षण माझ्यासाठी खूप भावूक करणारा होता. मी अनेक जोडप्यांना सांगू इच्छिते की लग्नानंतरही महिला आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात आणि यामध्ये पती तुम्हाला समर्थन देऊ शकतात.'

Ravindra Jadaja Wife Rivaba
Team India : वर्ल्डकपमध्ये चहलला बेंचवरच का बसवलं; संघातीलच खेळाडू म्हणाला...

रिवाबाबद्दल रविंद्र जडेजा म्हणाला होता की, 'रिवाबाही निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरली आहे. तिला अजून बरंच काही शिकायचं आहे. मला आशा आहे ती प्रगती करेल.' जडेजाने जामनगरच्या लोकांना रिवाबाला निवडून देण्याचे आवाहन देखील केले.

Ravindra Jadaja Wife Rivaba
महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.