Ravindra Jadeja becomes India's highest wicket-taker in ODI Asia Cup : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आशिया कप 2023 मध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. नेपाळविरुद्ध तीन बळी घेणाऱ्या जडेजाला पाकिस्तानविरुद्ध कोणतेही यश मिळाले नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात त्याने एक विकेट घेत एकदिवसीय आशिया कपमध्ये इतिहास रचला आहे.
एक विकेट घेऊन तो आता या स्पर्धेत भारताचा एकमेव सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी तो पराक्रम इरफान पठाणच्या नावावर होता.
आता रवींद्र जडेजा एकदिवसीय आशिया कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. इरफान पठाणने या स्पर्धेत 22 विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद करून स्पर्धेच्या इतिहासातील 23वी विकेट घेतली. एकूणच, त्याने या स्पर्धेत 23 बळी घेतलेल्या श्रीलंकेच्या दिग्गज चमिंडा वासची बरोबरी केली.
एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय खेळाडू
रवींद्र जडेजा- 24 विकेट्स
इरफान पठाण- 22 विकेट्स
कुलदीप यादव – 17 विकेट्स
सचिन तेंडुलकर- 17 विकेट्स
कपिल देव- 15 विकेट्स
श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात रवींद्र जडेजा बॅटने विशेष काही करू शकला नाही. या सामन्यात तो केवळ 4 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. जडेजाने वनडेमध्ये आतापर्यंत 200 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय सामन्यात एकदा 5 विकेट घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.