ICC Test Rankings : आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऑलराउंडरच्या गटात अव्वलस्थान पटकावले आहे. त्याने वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) मागे टाकले. या यादीत रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. जडेजाने श्रीलंके विरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात दमदार कामगिरी नोंदवली होती. बॅटिंगमध्ये नाबाद 175 धावा केल्यानंतर त्याने श्रीलंकेच्या दोन्ही डावात मिळून 9 विकेट घेतल्या होत्या. जडेजाने अव्वलस्थानावर झेप घेतल्यामुळे रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ऑलराउंडर रँकिंगमध्ये जडेजा 406 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. होल्डरच्या खात्यात 382 गुण असून अश्विन 347 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन चौथ्या तर इंग्लंडचा बेन स्टोक्स पाचव्या स्थानावर आहे.
फलंदाजीत कोहली-पंतचा फायदा
फलंदाजांच्या रँकिंगमध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी आपल्या स्थानात सुधारणा केलीये. किंग कोहली पाचव्या स्थानावर पोहचला असून पंतनेही टॉप टेनमध्ये जागा पक्की केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फटका बसला आहे. तो सहाव्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियन संघाचा मार्नस लाबुशेन 936 गुणांसह पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा जो रूट 872 गुणांसह दुसऱ्या तर स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.