Ind vs Eng : टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या कसोटीतून सर रवींद्र जडेजा बाहेर, कोणाला मिळणार संधी?

Ravindra Jadeja India vs England Test Series News 2024 :
Ravindra Jadeja India vs England Test Series marathi news
Ravindra Jadeja India vs England Test Series marathi newssakal
Updated on

India vs England Test Series 2024 :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे काही दिसत नाही. आधी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला. त्यानंतर पहिल्या कसोटी सामना जिंकेल असे वाटत होते पण पराभवाला सामोरे जावे लागले. आता संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत.

Ravindra Jadeja India vs England Test Series marathi news
Ind vs Eng : पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाला कोण जबाबदार? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला बेन स्टोक्सने धावबाद केले. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याला काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं दिसत होतं. आता हे स्पष्ट झाले आहे की त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे आणि दुसऱ्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.

जडेजाच्या धावबादमुळे टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असे म्हणाता येईल. कारण त्याची विकेट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. दुसरी कसोटी 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने भारताच्या नंबर वन अष्टपैलू खेळाडूला विशाखापट्टणममध्ये खेळणे कठीण दिसत आहे.

Ravindra Jadeja India vs England Test Series marathi news
WTC Points Table : द्रविड-रोहित सेनेला दुहेरी धक्का! इंग्लंडविरुद्धचा पराभव टीम इंडियाच्या आला अंगलट

रवींद्र जडेजाने भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक 87 धावा केल्या आणि दोन डावात पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो वेगाने धावण्याचा प्रयत्न करत होता. पण बेन स्टोक्सच्या अचूक थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो मैदानाबाहेर जाताना त्याला हॅमस्ट्रिंगची काही समस्या झाल्याचे दिसत होते.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामना वेळ खूप कमी आहे. जडेजाला अवघ्या चार दिवसांत थकवा आणि दुखापतीतून सावरणे कठीण असेल. जर जडेजा बाहेर गेला तर कुलदीप यादव खेळू शकतो. जडेजा संघासोबत विशाखापट्टणमला जाणार की बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.