भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्याचा दुसरा सामना आजपासून (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळला जाणार आहे.
पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी येत आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. 2023 च्या वर्ल्ड कपपासून तो घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार शमी अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज शमी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या शस्त्रक्रियेबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही.
अशा स्थितीत शमीला सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, असे मानले जात आहे. यामुळेच शमी इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर राहू शकतो. आता शमी फक्त आयपीएल 2024 च्या हंगामात गोलंदाजी करताना दिसणार आहे.
तर हैदराबाद कसोटी सामन्यात जडेजाला हॅमस्ट्रिंगची समस्या आली होती. यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, हॅमस्ट्रिंगची समस्या बरी होण्यासाठी किमान 4 ते 8 आठवडे लागतात. पण जडेजाच्या बाबतीत तो दीर्घ काळासाठी बाहेर असू शकतो. अशा परिस्थितीत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जडेजाचे पुनरागमन करणे अशक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
केएल राहुल संघात कधी परतणार?
स्टार खेळाडू केएल राहुलनेही पहिल्या कसोटी सामन्यात उजव्या मांडीत दुखत असल्याची तक्रार केली. पण त्याच्या दुखापतीबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही, कारण त्याच्या मांडीवर 2023 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यातही त्याला वेदना होत होत्या. त्यामुळेच राहुल लवकरच बरा होईल आणि 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना दिसणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.