Ravidnra Jadeja : रविंद्र जडेजाने पत्नी जिंकल्यानंतर दुसऱ्याचं ट्विट केलं रिट्विट

Ravidnra Jadeja Rreaction After Wife Rivaba Jadeja Won Election
Ravidnra Jadeja Rreaction After Wife Rivaba Jadeja Won Election esakal
Updated on

Ravidnra Jadeja Rreaction After Wife Rivaba Jadeja Won Election : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तरमधून निवडून आली आहे. गुजरात निवडणुकीत सर्वाधिक लक्ष असेलेला मतदार संघ म्हणून जामनगर उत्तरकडे पाहिले जात होते. भाजपने या जागेवर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रिवाबाला तिकीट दिलं होतं. भाजपचा हा विश्वास रिवाबाने सार्थ करून काँग्रेसच्या बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांचा 40 हजार 963 मतांनी पराभव केला. या विजयानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र सर्वांची नजर रविंद्र जडेजाच्या रिअॅक्शनकडे होती.

Ravidnra Jadeja Rreaction After Wife Rivaba Jadeja Won Election
Riwaba Jadeja: अहो ऐकलं का? मी जिंकले... रविंद्र जडेजाचा चेहरा खुलला!

रविंद्र जडेजाने रिवाबा जिंकल्यानंतर अजूनपर्यंत स्वत: ट्विट केले नाही. मात्र त्याने परिमल नथवानी यांचे ट्विट रिट्विट केले. परिमल यांनी 'रिवाबा जडेजा यांचे जामनगर उत्तर विधानसभा मतदार संघात विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन. लोकांनी तुम्ही केलेल्या समाज कार्यावर, तुमच्या कष्टावर आणि आश्वासनांवर विश्वास दाखवला.' असे ट्विट केले होते. हेच ट्विट रविंद्र जेडजाने आपल्या ट्विट अकाऊंटवर पत्नीच्या विजयानंतर पहिल्यांदा शेअर केले.

Ravidnra Jadeja Rreaction After Wife Rivaba Jadeja Won Election
India vs New Zealand : नव्या वर्षात न्यूझीलंड भारतात येणार; जाणून घ्या कधी अन् कोठे होणार सामने

रिवाबा आणि रविंद्र जडेजाने 2019 मध्ये भाजप प्रवेश केला होता. मात्र त्यापूर्वी रिवाबा या करणी सेनेची सदस्य होत्या. त्यांना 2018 मध्ये करणी सेनेच्या महिला विंगचे अध्यक्षही बनवण्यात आले होते. त्यानंतर भाजपने त्यांना यंदाच्या निडवणुकीत जामनगर उत्तरमधून आमदारकीच्या रिंगणात उतरवले. त्यासाठी पक्षाने तत्कालीन आमदार धर्मेशसिंह एम. जडेजा यांच तिकीट कापलं होतं. जेव्हापासून रिवाबा आणि रविंद्र जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच रिवाबा जामनगर उत्तर विधानसभा मतदार संघात सक्रीय झाल्या होत्या. त

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()