Ravindra Jadeja Sanjay Manjrekar Tweet Exchange : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यात विस्तव देखील जात नव्हता. संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाला सुमार दर्जाचा खेळाडू म्हणून संबोधले होते. त्यावर जडेजानेही तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांची ही शाब्दिक तलवारबाजी सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. मात्र गेल्या काही घटनांवरून या दोघांमध्ये आता पॅच अप झाले असून ते मित्र होत असल्याचे दिसून येत आहेत. दुखापतीतून सावरत असलेल्या रविंद्र जडेजाने केलेल्या ट्विटवरून तरी तसे दिसत आहे.
रविंद्र जडेजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर समालोचन करतानाचा संजय मांजरेकर यांचा फोटो शेअर करत लिहिले की, 'मी माझ्या खास मित्राला सध्या स्कीनवर पाहत आहे.' या ट्विटवर संजय मांजरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या दोघांच्या या ट्विट एक्सचेंजवरून या दोघांमधील नातं आता सुधारत असल्याचे दिसत आहे.
सध्या लेजंड लीगमध्ये समालोचन करत असलेल्या संजय मांजरेकरांनी जडेजाच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले की, '... आणि हा तुझा खास मित्र तुला लवकरात लवकर मैदानावर परतलेला पाहू इच्छितो.'
संजय मांजरेकर हे आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा त्यांच्या या सडेतोड वक्तव्यांमुळे वाद देखील उत्पन्न झाले आहेत. रविंद्र जडेजावरही त्यांनी टीका केली होती. त्याला जडेजानेही प्रत्युत्तर दिले होते.
आशिया कपमध्ये मांजरेकरांनी घेतला जडेजाची मुलाखत
नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाची मुलाखत घेतली. ही मुलाखत विशेष गाजली. मांजरेकरांनी जडेजाला तू माझ्यासोबत मुलाखत करायला तयार आहेस का असे विचारत जडेजाला चिमटा काढला होता. त्यावर जडेजाने देखील हसत हसत का नाही असे उत्तर दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये चांगले संभाषण झाले. आशिया कपमधील रविंद्र जडेजाच्या कामगिरीवर संजय मांजरेकर खूष होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.