अष्टपैलू रविंद्र जडेजा आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सध्या जडेजा आणि टीम इंडिया विलगीकरणात आहेत. नियमीत भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या जाडेजाचं एकवेळ संघातील स्थान पक्कं नव्हतं. 2018 च्या इंग्लड दौऱ्यापूर्वी जाडेजा जवळपास दीड वर्ष भारतीय संघाबाहेर होता. या काळातील भयावह अनुभव जडेजानं 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. (Those one-and-a-half years were filled with sleepless nights… : Ravindra Jadeja)
18 महिने संघाबाहेर होतास, पुनरागमन कसं केलं? या प्रश्नाचं उत्तर देताना जडेजा म्हणाला की, ' खरं सांगायचं तर संघाबाहेर असलेल्या काळात माझी जोप उडाली होती. डोळ्यासमोर नुसता अंधार असायचा. जोप व्यवस्थित लागत नव्हती. पहाटे अचानक जाग यायची. पुनरागमन कसं करायचं? याचाच विचार करत होतो. मला अंथरुणावर पडलो तरी झोप लागत नव्हती. कसोटी संघामध्ये होतो, पण संघात स्थान नव्हतं. एकदिवसीय आणि देशांतर्गत क्रिकेटही खेळत नव्हतो. टीम इंडियासोबत प्रवास करत होतो. मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत नव्हती. मी पुनरागमन कसं करणार ? याचाच विचार सतत डोक्यात येत होता.
2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जडेजाचं नशीब बदललं. ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात 332 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्ता सहा बाद 160 झाली होती. त्यानंतर मैदानावर आलेल्या जडेजानं झुंजार खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं. या सामन्यातील जडेजानं केलेल्या 86 धावांच्या खेळीचं कौतुक कोच रवी शास्त्री यांनाही केलं होतं. ओव्हल कसोटीनंतर माझं नशीबच बदललंयमाझ्या खेळात प्रचंड सुधारणा झाली. आत्मवश्वास वाढला... सर्वकाही माझ्या मनासारखं होतं गेलं. इंग्लंडच्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजासमोर धावा काढल्यानं फलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो, हे मला त्यावेळी समजलं. तुमचे तंत्र जगात कुठेही खेळण्यासाठी योग्य आहे, याची जाणीव होते. इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. पांड्याची दुखापत माझ्या पथ्यावर पडली. मला एकदिवसीय संघातही स्थान मिळालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.