Champions League : रेयाल माद्रिदकडून गतवर्षाच्या पराभवाची परतफेड; पेनल्टी शूटआउटवर गतविजेत्या मँचेस्टर सिटीवर मात

कमालीच्या उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात रेयाल माद्रिदने गतविजेत्या मँचेस्टर सिटीचा टायब्रेकरवर ४-३ असा पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Champions League
Champions League Sakal
Updated on

मँचेस्टर : कमालीच्या उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात रेयाल माद्रिदने गतविजेत्या मँचेस्टर सिटीचा टायब्रेकरवर ४-३ असा पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रेयालने सिटीविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या लढतीत मिळून ४-३ अशी बाजी मारली.

युरोपियन फुटबॉलमध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या रेयाल माद्रिदने १५ व्या चॅम्पियन्स लीग विजेतेपदासाठी अपेक्षा उंचावल्या आहेत. यंदा त्यांच्या मार्गात गतविजेते असलेल्या मँचेस्टर सिटी या संघाचाच मोठा अडथळा होता.

मँचेस्टर सिटीच्या होम ग्राऊंडवर हा सामना असल्याने रेयालला प्रेक्षकांचाही पाठिंबा नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी टायब्रेकर जिंकण्याची किमया केली. संपूर्ण सामन्यात सिटीचे वर्चस्व होते; परंतु गोल करण्यात त्यांचा सफाईदारपणा कमी पडत होता. अखेर पेनल्टी किकमध्ये रेयाल माद्रिदच्या खेळाडूंनी संयम राखत बाजी मारली.

गतवर्षीही मँचेस्टर सिटी आणि रेयाल माद्रिद यांचा उपांत्य फेरीतच सामना झाला होता. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील सामना सिटीच्या याच घरच्या मैदानावर झाला होता. त्यात त्यांनी ४-० असा दणदणीत विजय मिळवला होता. त्या वेळी झालेल्या पराभवाची रेयाल माद्रिदने परतफेड केली.

सामन्यातला पहिला गोल रेयालच्या नावावर झळकला होता. १२ व्या मिनिटाला रॉड्रेगोने हा गोल केला. त्यानंतर बरोबरीच्या गोलसाठी सिटीला ७६ व्या मिनिटापर्यंत झुंझावे लागले होते. पेनल्टी शुटआऊटवर लुका मॉड्रिकने पेनल्टी वाया घालवली. रेयाल माद्रिदला याचा फटका बसणार असे वाटत होते; परंतु सिटीच्या बर्नांडो सिल्वा आणि राखीव खेळाडू माटेओ कोवासिक यांनी पेनल्टी वाया घालवल्या.

बायरन म्युनिकचा विजय

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात बायरन म्युनिकने आर्सनेरचे आव्हान १-० असे मोडून काढले आणि उपांत्य फेरी गाठली. पहिल्या लढतीतील निकालानंतर त्यांनी दोन सामन्यांच्या सरासरीत ३-२ अशी बाजी मारली. या दुसऱ्या सामन्यात निर्णायक गोल किमिचने ६३ व्या मिनिटाला केला.

असे होते मँचेस्टर सिटीचे वर्चस्व

चेंडूवर नियंत्रण ः ६६% (सिटी) ः ३३% (रेयाल)

शॉर्टस ः ३३ (सिटी) ः ८ (रेयाल)

शॉटस ऑन टार्गेट ः ९ (सिटी) ः ३ (रेयाल)

कॉर्नर्स ः १८ (सिटी) ः १ (रेयाल)

फाऊल्स ः १५ (सिटी) ः ११ (रेयाल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.