Reliance-Disney Merger : रिलायन्स - डिज्ने एकत्र येणार, भारतातील स्ट्रीमिंग मार्केटवर अधिराज्य गाजवणार?

Reliance-Disney Merger
Reliance-Disney Merger esakal
Updated on

Reliance-Disney Merger : मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ड डिज्ने कंपनी यांच्यामध्ये विलीनीकरणाची बोलणी सुरू असल्याचे वृत्त आलं आहे. हे विलीनीकरण भारतीय बाजारपेठेसाठी असणार आहे. या दोन प्रमुख कंपन्यांमध्ये डिज्ने स्टार इंडियाचे रिलायन्सच्या व्हायकॉम 18 मधील विलीनीकरण, शेअर्सची अदलाबदली करण्याबाबत जानेवारीत चर्चा होणार आहे.

प्रस्तावित करारानुसार रिलायन्स व्हायकॉम 18 चे 51 टक्के शेअर्स घेईल अन् डिज्नेकडे 49 टक्के शेअर्स राहतील. दरम्यान कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये दोन्ही कंपन्यांचे समान प्रतिनिधित्व असणार आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही कंपनी मिळून कारभार करतील.

Reliance-Disney Merger
IPL 2024 Auction List : 333 खेळाडू अन् 77 स्लॉट! लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर

यापूर्वी ब्लूमबर्गने डिज्ने हॉटस्टार आणि स्टार इंडियासह भारतातील डिज्नेची संपत्ती ही अंदाजे 60 ते 70 हजार कोटीच्या दरम्यान आहे. मात्र डिज्ने ही संपत्ती 83 हजार कोटींच्या आसपास सांगते. जर रिलायन्स आणि डिज्नेचं विलीनीकरण झालं तर भारतीय माध्यम क्षेत्रातील रिलायन्सची स्थिती अधिकच मजबूत होणार आहे.

रिल्यान्सच्या व्हायकॉन 18 ची स्ट्रीमिंग ब्रँच जिओ सिनेमाने भारतातील स्ट्रीमिंग जगतात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी आयपीएलचे मोफत स्ट्रीमिंग करत भारतीय चाहत्यांच लक्ष वेधलं आहे. यापूर्वी आयपीएलचे डिजीटल हक्क हे डिज्ने हॉटस्टारकडे होते.

Reliance-Disney Merger
IND vs NEP : पाकविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे दमदार पुनरागमन! 50 षटकांचा सामना 43 चेंडूत जिंकला, उपांत्य फेरी पक्की?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()