Renuka Singh Thakur IND vs ENG : रेणुकाने इतिहास रचला! यापूर्वी अशी कामगिरी करणं कोणात्याही महिला क्रिकेटपटूला जमलं नव्हतं

T20 WC IND vs ENG Renuka Singh Thakur
T20 WC IND vs ENG Renuka Singh ThakurEsakal
Updated on

Renuka Singh Thakur T20 WC IND vs ENG: महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत रोखले. भारताकडून वेगावान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने भेदक मारा करत 15 धावात 5 बळी टिपले. इंग्लंडकडून नॅट सिवर ब्रंटने 50 तर एमी जोनेसने 27 चेंडूत 40 धावा केल्या.

रेणुकाची ही कामगिरी भारतीय महिला क्रिकेट संघाची टी 20 वर्ल्डकप इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. याचबरोबर टी 20 वर्ल्डकप इतिहासात भारताकडून 5 विकेट्स घेणारी पहिली महिला वेगवान गोलंदाज देखील ठरली.

T20 WC IND vs ENG Renuka Singh Thakur
Virat Kohli Chole Bhature Video : भडकलेला विराट ड्रेसिंग रूममध्ये 'ते' पार्सल येताच झाला खूष, कोच द्रविडलाही फुटलं हसू

आयसीसी टी 20 महिला वर्ल्डकपमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडशी भिडत आहे. हा सामना ग्रुपचा टॉपर ठरवणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या भारताने इंंग्लंडची पॉवर प्लेमध्ये अवस्था 3 बाद 29 धावा अशी केली होती. रेणुका सिंहने भेदक मारा करत इंग्लंडची टॉप ऑर्डर उडवली होती.

मात्र त्यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि हेथर नाईट या जोडीने इंग्लंडला सावरत 51 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. यामुळे इंग्लंड 11 व्या षटकात 80 धावांपर्यंत पोहचला. अखेर अनुभवी शिखा पांडेने कर्णधार हेथर नाईटला (28) बाद करत ही जोडी फोडली.

दुसरीकडे ब्रेंटने दमदार फलंदाजी करत अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला शंभरी पार करून दिली. तिला एमी जोन्सने आक्रमक फलंदाजी करत चांगली साथ दिली. मात्र अर्धशतकानंतर सिवर दिप्तीच्या गोलंदाजीवर लगेचच बाद झाली.

T20 WC IND vs ENG Renuka Singh Thakur
MS Dhoni Last IPL Match : अखेर ठरलं! CSK चा थला 'या' दिवशी खेळणार शेवटचा सामना

सिवर बाद झाली त्यावेळी इंग्लंडने 17 षटकात 5 बाद 120 धावा केल्या होत्या. यानंतर एमी जोनेसने 27 चेंडूत 40 धावा चोपून इंग्लंडला 150 धावांच्या जवळ पोहचवले. अखेर रेणुका सिंह ठाकूरने जोनेसला 40 धावांवर आणि कॅथरीन सिवर ब्रंटला 0 धावांवर बाद करत आपली पाचवी विकेट घेतली. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.