Gym Supplement impact on fertility : जीम सप्लिमेंटमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम... अभ्यासात काय स्पष्ट झालं?

जीममधील सप्लिमेंट लाईफस्टाईलमुळे सात पुरूषांपैकी एकाच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम
Gym Supplement impact on fertility
Gym Supplement impact on fertility esakal
Updated on

Gym Supplement impact on fertility : तरूणांमध्ये जीममध्ये जाण्याची, प्रोटिन सप्लिमेंट घेण्याची क्रेज खूप असते. मात्र जीममधील हे कल्चर, लाईफस्टाईलचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होतो यापासून ते अनभिज्ञ असतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार जीममधील सप्लिमेंट कल्चरचा भाग असलेल्या सात पुरूषांपैकी एकाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असं आढळून आलं आहे.

Gym Supplement impact on fertility
Ind vs Aus : सामना हरल्यानंतरही टीम इंडियाने मोडला 'हा' विक्रम! कांगारुंना टाकले मागे

रिप्रोडक्टिव्ह बायोमेडिसीन यांनी ऑनलाईन प्रकाशित केलेल्या एका सर्वेमध्ये नियमीत जीममध्ये जाणाऱ्या 152 तरूणांचा अभ्यास करण्यात आला. त्यात जीममध्ये जाणाऱ्या अनेक तरूणांना जीममधील लाईफस्टाईलचा त्याच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो याची कल्पनाच नव्हती.

जीममध्ये जाणारे जे तरूण सातत्याने प्रोटिन सप्लिमेंट घेतात त्यात एस्ट्रोजेनचे प्रमाण अधिक असते. अभ्यासानुसार अभ्यासात भाग घेतलेले जवळपास 79 टक्के पुरूष हे सप्लिमेंट घेतात.

ज्यावेळी या पुरूषांना सप्लिमेंटमुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो याची काळजी वाटत नाही का असे विचारले असता 52 टक्के सहभागी लोकांनी याबाबत विचार केल्याचा आणि 14 टक्के सहभागी तरूणांनी सप्लिमेंटचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो हे गृहित धरल्याचे सांगितले.

Gym Supplement impact on fertility
Kane Williamson : सलग चौथ्या कसोटीत शतकी खेळी! फॅब 4 मध्ये केन विलियमसनने विराट कोहलीशी केली बरोबरी

जीममधील हे सप्लिमेंट कल्चर त्यांच्या प्रजनन क्षमतेपेक्षा जास्त महत्वाचे आहे का असे विचारले असता 38 टक्के तरूणांनी नाही तर 28 टक्के होय असं उत्तर दिलं. जीममधील सप्लिमेंटचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो याबाबत पुरूषांपेक्षा महिला जास्त सजग असल्याचं अभ्यासात दिसून आलं.

बर्मिंगहम विद्यापीठातील डॉ. गॅलाघेर यांनी हा अभ्यास केला आहे. ते म्हणातात की, 'निरोगी राहणं, निरोगी लाईफ स्टाईल असणं ही एक चांगली गोष्ट आहे. पुरूंषाच्या प्रजनन क्षमतेचा विषय येतो त्यावेळी जीममधील हाय प्रोटिन्स सप्लिमेंट कल्चर हा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे.'

'सर्वात चिंतेची बाब म्हणजे एस्ट्रोजेन हे फिमेल हार्मोन वे प्रोटिन आणि सोया प्रोटिन या दोन्ही सप्लिमेंटमध्ये जास्त प्रमाणात असतं. शरिरात जर खूप जास्त प्रमाणात फिमेल हार्मोन वाढले तर त्याचा परिणाम हा शुक्राणू तयार होण्यावर होतो.'

Gym Supplement impact on fertility
खतरनाक...! 'या' खेळाडूने क्रिकेट विश्वात उडवून दिली खळबळ, एकही धाव न देता घेतल्या ८ विकेट

'प्रामुख्याने प्रोटिन सप्लिमेंटमध्ये अॅनाबॉलिक स्टेरॉईड आढळून आले आहेत. त्यामुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होते. टेस्टेकल्सचा आकार कमी होतो.'

डॉ. गॅलाघेर पुढे म्हणाले की, 'वंध्यत्व ही एक वाढती समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगातील 6 पौकी एका व्यक्तीला तरी या समस्येतून जावं लागत आहे. जागतिक स्तरावरील अभ्यासात असं मानलं जातं की वंध्यत्वाच्या समस्येत अर्धा वाटा हा पुरूषांचा देखील आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.