India Women vs Australia Women 4th T20I : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3 - 1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने विजयसाठी ठेवलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 5 बाद 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. रिचा घोषने 19 चेंडूत 40 धावा तर दिप्ती शर्माने 8 चेंडूत 12 धावा करत शेवटपर्यंत झुंज दिली.
शेवटच्या षटकाचा थरार
12 चेंडूत 38 धावांची गरज असताना रिचाने ग्रॅहमला सलग दोन षटकार आणि एक चौकार मारत सामना 9 चेंडूत 22 धावा असा आणला. तिने 19 व्या षटकात 18 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती.
दिप्ती शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत हे इक्वेशन 5 चेंडूत 16 धावा असे आणले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव झाली. तर तिसरा चेंडूवर रिचाने एक धाव केली. स्ट्राईक परत आलेल्या दिप्ती शर्माने चौकार मारत सामना 2 चेंडूत 10 धावा असा आणला. मात्र दुसऱ्या चेंडूवर शर्माला एकच धाव करता आली. शेवटच्या चेंडूवर 9 धावांची गरज असताना रिचाने 1 धाव केली. यामुळे भारताचा अवघ्या 7 धावांनी पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाचे 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती मानधनाने 10 चेंडूत 16 धावा करत शफाली वर्माची साथ सोडली. त्यानंतर शफाली वर्मा देखील 16 चेंडूत 20 धावा करत माघारी परतली. जेमिमाह रॉड्रिग्ज 8 धावांची भर घालून पॅव्हेलियनमध्ये परतली. रॉड्रिग्ज बाद झाली त्यावेळी भारताच्या 7 षटकात 3 बाद 49 धावा झाल्या होत्या.
यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि देविका वैद्य 72 धावांची भागीदारी रचत संघाला 15 व्या षटकात 121 धावांपर्यंत पोहचवले. मात्र हरमनप्रीत कौर धावांची गती वाढवण्याची गरज असतानाच 30 चेंडूत 46 धावा करून बाद झाली.
हरमन बाद झाल्यानंतर आलेल्या रिचा घोषने आल्या आल्या फटकेबाजी करत धावांची गती वाढवली. मात्र दुसऱ्या बाजूने देविका वैद्यला मोठे फटके खेळण्यात अपयश येत होते. अखेर ती 26 चेंडूत 32 धावा करत बाद झाली. यानंतर आलेल्या दिप्ती शर्मा आणि रिचा घोषने सामना शेवटपर्यंत नेला.
विजयासाठी 6 चेंडूत 20 धावांची गरज असताना दिप्तीने दोन चौकार मारत सामना जवळ आणला. शेवटी समीकरण 2 चेंडूत 10 धावा असे राहिले असताना दिप्तीला एकच धाव करता आली अन् भारताच्या हातून सामनान निसटला. ऑस्ट्रेलियाकडून एलना किंग आणि अॅश्लेघ गार्डनेरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.