कोहलीच्या खराब फॉर्मवर पाँटिंगचे मोठं वक्तव्य; भारतीय संघाचा मी प्रशिक्षक असतो तर...

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल रिकी पाँटिंगचे मोठं विधान
ricky ponting statement on virat kohli
ricky ponting statement on virat kohliSAKAL
Updated on

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही. धावांच्या दुष्काळातून जात असेलल्या विराट कोहलीवर भारतातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठवली होती. खराब फॉर्ममुळे विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार नाही का? विराट कोहली सर्वांच्या निशाण्यावर असून हा प्रश्न जोरात उपस्थित होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंगने विराट कोहलीच्या फॉर्मवर वक्तव्य केलं आहे.(ricky ponting statement on virat kohli)

ricky ponting statement on virat kohli
World Chess Championship स्पर्धेतून कार्लसनची माघार; नवा विश्‍वविजेता मिळणार

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने उघडपणे विराट कोहलीचा बचाव केला आहे. त्याने कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनालाही सल्ला दिला. भारतीय संघाने विराट कोहलीला मदत करण्याची गरज असल्याचे पाँटिंग म्हणाला. फलंदाजीत त्याची जागा बदलण्यापेक्षा संघ व्यवस्थापनाने त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

ricky ponting statement on virat kohli
Commonwealth Games पूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का!

आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटिंग म्हणाला की, जर तुम्ही विराट कोहलीला वर्ल्ड कपच्या आधी संघा बाहेर काढले तर त्याच्या जागी दुसर कोणीतरी चांगलं खेळेल, पण विराट कोहलीला परत खेळणे कठीण होईल. मी भारतीय संघ असतो तर विराट बरोबर उभा राहिलो असतो, कारण मला अशा टप्प्यांबद्दल माहिती आहे. प्रशिक्षक-कर्णधार या नात्याने विराट कोहलीवरील सर्व दडपण दूर करण्याचा माझा प्रयत्न असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.