IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत

IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत
Updated on

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात भारताने 20 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली. भारताचा हा टी 20 क्रिकेटमधील मायदेशातला सलग 14 वा मालिका विजय आहे. 2019 पासून भारताला भारतात कोणीही हरवू शकलेलं नाही. नुकतेच वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला देखील भारताच्या नवख्या संघाला मालिकेत आव्हान देणं जमलं नाही. याचबरोबर भारत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ देखील झाला आहे.

आजच्या सामन्यात भारताकडून फलंदाजीत रिंकू सिंहने 46 धावांची दमदार खेळी केली. त्याला नवख्या जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा ठोकत उत्तम साथ दिली होती. गोलंदाजीत अक्षर पटेलने जमलेली जोडी फोडत भारतालाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 3 विकेट्स घेतल्या तर पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने 2 बळी टिपत त्याला चांगली साथ दिली.

IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत
IPL 2024 Auction : जोफ्रा आर्चर लिस्टमधून गायब; 1166 खेळाडूंनी केली नोंदणी

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. भारताकडून रिंकू सिंहने दमदार फलंदाजी करत 46 धावा केल्या.

सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी देखील अनुक्रमे 37 आणि 32 धावांचे योगदान दिले. स्लॉग ओव्हरमध्ये जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा चोपत भारताची धावगती वाढवली.

चौथ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिले षटक जवळपास निर्धाव टाकले. यशस्वी जयस्वालच्या 6 षटकात शुन्य धावा झाल्या होत्या.

मात्र त्यानंतर त्याने आपला गिअर बदलला अन् पॉवर प्लेमध्ये भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. या अर्धशतकी सलामीत यशस्वीच्या 37 तर ऋतुराजच्या 7 धावांचे योगदान होते. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी बाद झाला.

IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत
Mitchell Marsh World Cup Trophy : एवढं काय त्यात... ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मार्शची आली पहिली प्रतिक्रिया

यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर 8 तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 1 धावांची भर घालून माघारी परतले. भारताची अवस्था बिनबाद 50 वरून 3 बाद 63 धावा अशी झाली. सामन्याच्या नवव्या षटकातच फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंह आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला.

हा डाव सावरण्याच्या नादात रनरेट थोंड सुस्त पडलं होतं. मात्र 12 व्या षटकानंतर रिंकू आणि ऋतू गायकवाडने गिअर बदलला. रिंकूने रायपूरच्या मोठी बाऊड्री असलेल्या स्टेडियममध्ये देखील लांब - लांब षटकार मारत आपला दम दाखवला.

मात्र 14 व्या षटकात ऋतुराज 32 धावा करून बाद झाला. आता सर्व मदार ही रिंकू सिंहवर होती. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या जितेश शर्माने ही जबाबदारी वाटून घेत ऑस्ट्रेलियाची पहिल्या चेंडूपासून धुलाई करण्यास सुरूवात केली.

या दोघांनी 18 व्या षटकात संघाचे दीडशतक ठोकले. दरम्यान, रिंकू आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. या दोघांनी 32 चेंडूत 56 धावांची भागीदारी रचली. मात्र डावाचे 19 वे षटक सुरू असताना जितेश शर्मा 19 चेंडूत 35 धावा करून बाद झाला.

त्यानंतर रिंकू देखील शेवटच्या षटकात 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताने 20 षटकात 9 बाद 174 धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.