India Squad For SA vs IND ODI : दमदार कामगिरीचं बक्षीस! दक्षिण अफ्रिकेत रिंकूसह अजून दोन फलंदाजांना वनडे पदार्पण करण्याची संधी

India Squad For South Africa Tour
India Squad For South Africa Tour esakal
Updated on

India Squad For South Africa Tour : दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे, टी 20 आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने आज आपल्या संघांची घोषणा केली. वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी अनेक तरूण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारताच्या रिंकू सिंहला टी 20 पाठोपाठ आता वनडे संघात देखील स्थान देण्यात आले आहे. रिंकूने सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या टी 20 मालिकेत मॅच फिनिशर म्हणून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आता त्याची खरी परीक्षा दक्षिण अफ्रिकेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर होणार आहे.

India Squad For South Africa Tour
Ajinkya Rahane : रहाणे - पुजारासाठी भारतीय संघाची दारे झाली कायमची बंद?

रिंकू सिंहसोबतच रजत पाटीदार आणि साई सुदर्शन या दोन नव्या चेहऱ्यांना देखील वनडे संघात स्थान मिळालं आहे. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत हंगाम गाजवल असून त्यांनी निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. साई सुदर्शनने लिस्ट ए च्या 22 सामन्यात 65.05 च्या सरासरीने 1236 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकांचा देखील समावेश आहे.

दुसरीकडे रजत पाटीदारने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी 20 मध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. मात्र त्या सध्या तरी वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याने लिस्ट ए मध्ये तीन शतकी खेळींसह 55 सामन्यात 1813 धावा केल्या आहेत.

India Squad For South Africa Tour
IND Squad For SA Tour : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाने बदलला कर्णधार? 'या' खेळाडूकडे दिली संघाची धुरा

भारताचा दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा वनडे संघ :

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.