Rinku Singh : रिंकूनं 39 चेंडूत नाबाद 68 धावा करूनही का मागितली माफी?

Rinku Singh
Rinku Singh esakal
Updated on

Rinku Singh : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव केला. भारताने 19.3 षटकात 180 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे खेळ वाया गेला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान आले. हे आव्हान त्यांनी 13.5 षटकातच 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून रिंकू सिंहने दमदार खेळी करत 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले वहिले अर्धशतक ठोकलं. मात्र हे अर्धशतक वाया गेलं. चेंडू ओला झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला अन् भारत हरला.

Rinku Singh
Delhi Police VIDEO : पॅरा बॅडमिंटनपटूसाठी दिल्ली पोलीस बनले देवदूत; लाख मोलाची 'संपत्ती' असलेली बॅग त्वरित काढली शोधून

मात्र सामन्यानंतर रिंकू सिंहने बोलताना माफी मागितली. ज्यावेळी रिंकू सिंहने अर्धशतक ठोकले त्यावेळी त्याने एक दमदार षटकार मारला. हा षटकार थेट कॉमेंटरी बॉक्सवर जाऊन आदळला. बॉक्सची काच फुटली.

रिंकूला सामना झाल्यानंतर मुलाखतीवेळी त्याच्या षटकारामुळे काच फुटल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी त्याने यासाठी माफी मागितली. तो म्हणाला की, 'मला माहिती नाही की माझ्या फटक्यामुळे काच फुटली. त्याबद्दल क्षमस्व.'

रिंकूने 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळेच भारताने 180 धावांपर्यंत पोहचवले.

Rinku Singh
India U-19 Squad : बीडचा सचिन अन् सोलापूरच्या अर्शिनची वर्ल्डकप संघात वर्णी, महाराष्ट्र - मुंबईच्या तीन खेळाडूंना संधी

दक्षिण आफ्रिकेकडून 152 धावा चेस करताना सलामीवीर रीझा हेंड्रिक्सने 49 धावांची दमदार खेळी केली. त्याला कर्णधार एडिन माक्ररमने उत्तम साथ देत 30 धावा केल्या. मालिकेतील पहिला सामना वॉश आऊट झाला होता. आफ्रिकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून भारताला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()