Rishabh Pant : टीम इंडियाकडून ऋषभ पंतला Ignore; 'त्या' व्हिडीओमुळे...

टीम इंडियामध्ये या दिग्गज खेळाडूकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा...
rishabh pant being ignored in team india
rishabh pant being ignored in team india sakal
Updated on

Team India Ignored Rishabh Pant : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ आता नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. बुधवारपासून (28 सप्टेंबर) टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. याशिवाय तीन एकदिवसीय सामनेही खेळवले जातील. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. भारताची तयारी पूर्ण करण्यासाठी ही शेवटची मालिका आहे.

rishabh pant being ignored in team india
Sanju Samson : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू टीम इंडियाचा उपकर्णधार?

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? टी-20 विश्वचषक 2022 दरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये दोघांपैकी कोणाला प्राधान्य मिळेल यावर सस्पेन्स कायम आहे. याबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मालाही प्रश्न विचारण्यात आला असता. तो म्हणाला की, टीम इंडियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतला पहिले प्राधान्य होते, परंतु दिनेश कार्तिकच्या पुनरागमनानंतर समीकरण थोडे बदलले आहे.

rishabh pant being ignored in team india
Pakistan Cricketer: लाइव्ह मॅच दरम्यान PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी! खेळाडू म्हणाला...

आशिया चषक स्पर्धेत कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य देण्यात आले होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघाने दिनेश कार्तिकवर अधिक विश्वास दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर कर्णधार रोहितने दिनेश कार्तिककडे ट्रॉफी सुपूर्द केली. दुसरीकडे ऋषभ पंत संघापासून थोडा अलिप्त दिसत होता. एका चाहत्याने ऋषभ पंतचा न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. टीम इंडियामध्ये या दिग्गज खेळाडूकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.