Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली जबर दुखापत

Cricketer Rishabh Pant Car Accident
Cricketer Rishabh Pant Car Accidentsakal
Updated on

Cricketer Rishabh Pant Car Accident : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारचा दिल्लीहून घरी परतत असताना मोठा अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्यांच्या कारचा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहे.

Cricketer Rishabh Pant Car Accident
Pele Passed Away : चहाच्या दुकानात काम करणारा 'पेले' कसा बनला महान फुटबॉलपटू; जाणून घ्या मनाला भिडणारी कहाणी

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

Cricketer Rishabh Pant Car Accident
Pele Passes Away: खरंच पेले यांनी एक भयंकर युद्ध रोखलं होतं का? का म्हणायचे शांतीदूत जाणून घ्या

ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि पंत यांना मोठ्या मुश्किलीने कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंत ज्या मर्सिडीज कारमध्ये घरी परतत होता, त्या गाडीची नंबर प्लेट DL 10 CN 1717 आहे. अपघातानंतर पंत यांच्या गाडीतून काही पैसेही पडले, जे स्थानिक लोकांनी उचलले.

Cricketer Rishabh Pant Car Accident
Pele Passed Away : चहाच्या दुकानात काम करणारा 'पेले' कसा बनला महान फुटबॉलपटू; जाणून घ्या मनाला भिडणारी कहाणी

अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीत त्याचे शतक हुकले, पण त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने या सामन्यात भारताला पुढे आणले होते. त्यामुळेच दुसऱ्या डावात महत्त्वाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही टीम इंडियाने सामना जिंकला. मात्र नुकतेच एकदिवसीय आणि टी-20 मधील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()