Rishabh Pant : जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलला... पंतने अपघातानंतर दिली पहिल्यांदाच मुलाखत

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accidentesakal
Updated on

Rishabh Pant : भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 ला पहाटे 5.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला होता. पंत दिल्लीवरून देहरादूनच्या दिशेने आपल्या घराकडे जात होता. तो नवीन वर्ष कुटुंबासोबत साजरे करणार होता. यासाठी तो आईला अचानक भेटून सरप्राईज देणार होता. मात्र त्याचा सामना मृत्यूशी झाला.

25 वर्षाचा ऋषभ या भीषण अपघातातून थोडक्यात बचावला. या अपघातानंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या दुखापतीतून सावरत असलेल्या पंतने अपघातानंतर पहिल्यांदाच मुलाखत दिली. यावेळी तो आता आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोणातून पाहत असल्याचे सांगितले.

Rishabh Pant Accident
Jasprit Bumrah IPL 2023 : बुडत्याचा पाय खोलात! जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर मोठी अपडेट

पंत आयएएनएसशी बोलताना म्हणाला की, 'आता मी आयुष्याचा संपूर्णपणे आनंद घेण्यावर विश्वास ठेवतोय. मी छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश करतोय. आपण दैनंदिन कार्यक्रमात याकडे दुर्लक्ष करत असतो. आज काहीतरी विशेष प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण झटतोय. मात्र आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचे विसरून गेलो आहोत. या गोष्टी आपल्याला आनंद देतात.'

ऋषभ पुढे म्हणाला की, 'अपघातानंतर मला प्रत्येक दिवशी ब्रश करण्याबरोबरच कोवळ्या उन्हात बसण्यानेही आनंद मिळतोय. आपण आपले ध्येय प्राप्त करण्याचा नादात जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हा एक माझ्यासाठी धडा होता.'

Rishabh Pant Accident
Steve Smith : मी हे काय करतोय... स्टीव्ह स्मीथने सांगितला तो दुर्मिळ किस्सा

पंत क्रिकेटबद्दल म्हणाला, 'क्रिकेट माझ्या आयुष्यात काय आहे हे सांगळे कठिण आहे. मात्र मी माझ्या पायावर पुन्हा उभे राहण्यावर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. मी रोज तीनवेळा फिजिओथेरपिस्टसोबत व्यायम करतोय. ही प्रक्रिया जोपर्यंत मी चालायला लागणार नाही तोपर्यंत सुरू राहील.'

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.