लिसेस्टर : भारताने इंग्लंडमधील पहिल्या कसोटीपूर्वी खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यात पहिला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला होता. यावेळी भारताकडून श्रीकार भरतने (Srikar Bharat) नाबाद 70 धावांची दमदार खेळी केली होती. आज दुसऱ्या दिवशी लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. याचबरोबर मोहम्मद शमीने 3 तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेत गोलंदाजीचा चांगला सराव करून घेतला. (Rishabh Pant Hit Half Century In India vs Leicestershire Practice Match)
भारताने पहिला डाव 246 धावांवर घोषित केल्यानंतर लिसेस्टरशायरने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात केली. मात्र सलामीला आलेला भारताचा चेतेश्वर पुजारा शुन्यावर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यासमोर लिसेस्टरशायरची अवस्था 4 बाद 71 अशी झाली होती. मात्र ऋषभ पंतने 74 धावांची खेळी करत संघाला द्विशतकी मजल मारून दिली. मात्र पंतची ही खेळी रविंद्र जडेजाने संपवली. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी लिसेस्टरशायरने 46 षटकात 7 बाद 212 धावा केल्या होत्या.
भारताकडून मोहम्मद शमीने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेत चांगला मारा केला. त्यांना जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. मात्र उमेश यादवची विकेटची पाटी अजूनही कोरीच होती. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून रोहित शर्माने 25, शुभमन गिलने 21 तर विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली. मात्र श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. उमेश यादवने 23 तर मोहम्मद शमीने 18 धावा करत आपला फलंदाजीचा सराव करून घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.