Rishabh Pant : टीम इंडियाचा ढाण्या वाघ आला रे...! 'या' मालिकेतून करणार पुनरागमन

Rishabh Pant
Rishabh Pant
Updated on

Rishabh Pant : टीम इंडियाचा ढाण्या वाघ युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला त्याचा कार अपघात झाला होता आणि ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. याच कारणामुळे पंत वर्ल्ड कप खेळू शकला नाही.

पण आता पंतबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पंत लवकरच पुनरागमन करू शकतो. पंतने सराव सुरू केला असून हळूहळू त्याची लय प्राप्त होत आहे. पंत या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.

Rishabh Pant
Ind vs Eng Playing 11 : लखनौचे ‘नवाब’ होण्याची संधी! खेळपट्टी पाहता रोहित कोणत्या प्लेइंग-11 सोबत खेळणार?

ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. तो बर्याच काळापासून येथे आहे आणि त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. वर्ल्ड कप-2023 मध्ये टीम इंडियासाठी केलेल्या काही जाहिरातींमध्ये तो दिसला होता. अशा परिस्थितीत पंत लवकरच पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

Rishabh Pant
'याच मैदानावर मला IPL सामना खेळताना दुखापत...' IND vs ENG सामन्यापूर्वी KL राहुलच्या झाली त्या घटनेची आठवण

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, त्यानंतर तो टीम इंडियासाठी खेळले. वृत्तानुसार, पंत 23 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या भारताच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करेल.

या स्पर्धेत खेळून पंत आपली लय परत मिळवेल आणि त्यानंतर पुढील वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो टीम इंडियात परतेल. पुढच्या वर्षी पंतची रिकव्हरी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे कारण पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पंत हा या फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.