Rishabh Pant : 'दगडावर दगड मारला तर...', मालिका जिंकल्याबद्दल ऋषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल; तुम्ही पण बघा Video

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका संपली आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.
Rishabh Pant  Video Post Viral
Rishabh Pant Video Post Viralsakal
Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका संपली आहे. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पावसामुळे एक तास उशिरा सुरू झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना नऊ गडी गमावून 137 धावा केल्या.

प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ आठ गडी गमावून 137 धावा करू शकला नाही. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. मालिका जिंकल्यानंतर ऋषभ पंतने अनोख्या पद्धतीने संघाचे अभिनंदन केले आहे. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Rishabh Pant  Video Post Viral
Paris Olympic 2024 : वयाच्या ५५व्या वर्षी दहावी ऑलिंपिक स्पर्धा; निनो सालुक्वाद्झे हिचा आगळा विक्रम, पहिलीच महिला

ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने 'दगडावर दगड मारला तर...' हे गाणे त्या व्हिडिओला लावले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

Rishabh Pant  Video Post Viral
Paris Olympic 2024 : अखेर सीन नदीत जलतरणपटूंचा सूर; अनिश्चिततेनंतर पॅरिस ऑलिंपिक ट्रायथलॉनमधील जलतरण स्पर्धेस सुरुवात

दरम्यान, ऋषभ पंत आता रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि इतर वरिष्ठ खेळाडूंसोबत एकदिवसीय मालिकेपूर्वी कोलंबोमध्ये सामील झाला आहे. केएल राहुलने 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपिंग केले होते. मात्र, ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे पहिल्या वनडेत विकेटकीपिंगची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार हे पाहणे बाकी आहे.

पंत बऱ्याच दिवसांनी वनडे खेळताना दिसणार आहे. पंतने नोव्हेंबर 2022मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याचा कार अपघात झाला आणि मार्चमध्ये तो क्रिकेटच्या मैदानात परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.