Rishabh Pant Video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत फलंदाजी करताना षटकार अन् चौकारांचा पाऊस पाडत आहे.
आगामी क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा थरार 5 ऑक्टोबरपासून भारतात रंगणार आहे, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी त्यांच्या संघाच्या घोषणा सुधा केल्या आहेत, भारताने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही, या सगळ्या लगबगीत पंतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
अपघातानंतर पंतने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बराच वेळ घालवला. यादरम्यान त्याने आधी स्वत:ला तंदुरुस्त केले आणि नंतर विकेटकीपिंग-बॅटिंगचा सराव केला. प्रथमच आता तो मैदानात उतरून खेळत आहे. लोकल सामन्यात त्याने बराच वेळ फलंदाजी करत चौकार आणि षटकार मारले.
30 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर पंतच्या कारचा अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्या शरीरावर खुप जखमा झाल्या होत्या. अलीकडेच फलंदाजी आणि विकेटकीपिंग पुन्हा सुरू केल्यानंतर पंतची पुनरागमनाची तारीख अजून लांब आहे. पुढील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करेल, असे म्हटल्या जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.