Ind vs Sa: शेवटच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर ऋषभ पंतचा अनोखा विक्रम

भारतीय कर्णधार ऋषभ पंतने चालू मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.
Rishabh Pant unwanted record south africa
Rishabh Pant unwanted record south africa
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत भारतीय संघाला एकही नाणेफेक जिंकता आलेली नाही. गेल्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर पंतच्या नावावर नको असलेला अनोखा विक्रम नावावर झाला आहे. (Rishabh Pant unwanted record south africa)

Rishabh Pant unwanted record south africa
युवीने 'फादर्स डे'च्या दिवशी दाखवली मुलाची पहिली झलक अन् नाव ठेवले...

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा या निर्णायक सामन्यातून बाहेर पडला. त्याला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. बावुमाच्या जागी केशव महाराज पाचव्या आणि अंतिम T20I सामन्यात आफ्रिकन संघाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय कर्णधार ऋषभ पंतने चालू मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.

पाचही सामन्यांमध्ये भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. कोणत्याही 5 सामन्यांच्या मालिकेत सलग सर्व नाणेफेक गमावण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे.

Rishabh Pant unwanted record south africa
Chess Olympiad : चेस ऑलिम्पियाडसाठी PM मोदींच्या हस्ते मशाल लॉन्च

पावसामुळे सामना 19-19 षटकांचा करण्यात आला आहे. 27 धावांवर भारताने आपले दोन विकेट गमावल्या. सामन्यात पुन्हा पाऊस सुरू झाला असून त्यामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला आहे. ईशान किशन 15 धावांवर आणि ऋतुराज गायकवाड 10 आउट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()