ऋषभ पंत धोनीलाही मागे टाकेल; इरफान पठाणचे मोठे वक्तव्य

Rishabh Pant Will Surpasses Mahendra Singh Dhoni
Rishabh Pant Will Surpasses Mahendra Singh Dhoni esakal
Updated on

भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs Sri Lanka) दुसऱ्या डावात 28 चेंडूत अर्धशतक ठोकून कसोटी क्रिकेटमधील भारताकडून ठोकण्यात आलेल्या सर्वात वेगवान अर्धशतकाचा 40 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. याचबरोबर पंतने आपला रोल मॉडेल महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) 34 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही मागे टाकला. पंतवर जाम खूष झालेल्या भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) पंतच्या भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले.

Rishabh Pant Will Surpasses Mahendra Singh Dhoni
IPL 2022 : 'मॅकेनिक दिसतोस', गुजरात टायटन्सची जर्सीवर कमेंटचा पाऊस

कपिल देव यांचे 40 वर्ष जुने रेकॉर्ड मोडून ऋषभ पंत हा भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. पंतने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केलेल्या या कमगिरीवर इरफान पठाण खूष झाला. ऋषभ पंतच्या या खेळीतून तो आपल्या फलंदाजीत सुधारणा करत असल्याचे दिसून येते असे पठाण म्हणाला. 'पंतने आपल्या फलंदाजीच्या पद्धतीत सुधारणा केली आहे हे नक्की. त्याच्या या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो आहे. यापूर्वी तो नुसती लेग साईडला फटकेबाजी करत सुटायचा मात्र आता तो ऑफ साईडलाही चांगले फटके मारतोय.'

Rishabh Pant Will Surpasses Mahendra Singh Dhoni
Video: पोलिसांची 'फिटनेस' टेस्ट घेणाऱ्या विराट चाहत्याची अखेर मानगुट धरलीच

इरफान पठाण पुढे म्हणाला की, 'आता पंत विकेटवर थांबण्याचे मार्ग शोधत आहे. तो फक्त फटकेबाजी करत सुटत नाही तर त्याच्या रेकॉर्ड ब्रेक खेळीत तो डिफेन्स करताना दिसलाच नाही असं नाही. त्याने काही चेंडू डिफेन्स देखील केले.' पंतने आपल्या अर्धशतकातील 40 धावा या चौकारातून आल्या होत्या. पंतच्या या बॅटिंगनंतर इरफान पठाणने त्याच्या भिवष्याबाबत (Inrfan Pathan Statement About Rishabh Pant Future) एक मोठे वक्तव्य केले.

Rishabh Pant Will Surpasses Mahendra Singh Dhoni
VIDEO: पाकिस्तानवरील विजयानंतर बांगलादेशच्या पोरी बेभान होऊन नाचल्या

धोनीच्या नावावर आहे. त्याने 90 कसोटीत 4876 धावा केल्या आहेत. पंतने सध्या 30 कसोटीत 1920 धावा केल्या आहेत. याबाबत पठाण म्हणतो, 'तो फक्त 24 वर्षाचा मुलगा आहे. इतक्या कमी वयात त्याने आपल्या खेळात चांगली सुधारणा केली आहे. मला विश्वास आहे की ज्यावेळी तो त्याची क्रिकेट कारकिर्द संपवेल, अजून त्याला खूप अवकाश आहे. तुम्ही त्याला अजून 10 वर्षे तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहाल. मात्र त्यावेळी तो भारताचा कसोटीतील सर्वाधिक धावा करणारा विकेटकिपर बॅट्समन बनला असेल. याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.'

इरफान म्हणाला, 'त्याने कठिण विकेटवर अत्यंत महत्वाच्या धावा केल्या आहेत. त्याच्या सातत्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायचे. मात्र आता तो एक परिपक्व फलंदाजासारखा खेळत आहे. त्याला कपिल पाजींकडून गिफ्ट लवकरच मिळेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.