Riyan Parag : भारतात वर्ल्डकप सोबतच सईद मुश्ताक अली ट्रॉफी देखील सुरू होती. या स्पर्धेत आसामचा एकटा वाघ लढत होता. तो वाघ म्हणजे रियान पराग! या पठ्ठ्याने सलग 7 सामन्यात 7 अर्धशतके ठोकत विक्रम केला. आता या कामगिरीचे फळ रियान परागला मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचे दार उघडण्याची शक्यता आहे.
रियान परागने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी केली आहे. त्याने सलग सात सामन्यात सात अर्धशतके ठोकली. त्याने फक्त 10 सामन्यात 510 धावा ठोकल्या. त्याची सरासरी 85.00 इतकी होती. त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत 182.79 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे आसामने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत सेमी फायनल गाठली होती.
रियान पराग हा फक्त आक्रमक फलंदाज नाही तर गोलंदाजी देखील चांगली करतो. रियान पराग हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत 24.54 च्या सरासरी आणि 7.29 च्या इकॉनॉमी राखत 11 विकेट्स घेतल्या आहेत. 9 धावात 3 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. तो पार्ट टाईम ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
रियान परागने देवधर ट्रॉफीमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. तो स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 5 सामन्यात 354 धावा केल्या. त्याची सरासरी 88.50 होती तर स्ट्राईक रेट हे 136.67 इतके होते. त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.