रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?

राजस्थान रॉयल्स युवा खेळाडू रियान परागने लीग मॅचदरम्यान आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसोबतच्या ऑन-फील्ड लढाईवर मौन सोडले आहे.
रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?
esakal
Updated on

राजस्थान रॉयल्स युवा खेळाडू रियान परागने लीग मॅचदरम्यान आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसोबतच्या ऑन-फील्ड लढाईवर मौन सोडले आहे. लाईव्ह मॅचदरम्यान दोघांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली होती. इतकेच नव्हे तर दोघे एकमेकांना भिडलेदेखील होते. यासर्व घटनेवर रियान परागने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?
सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला 'तो' किस्सा

लाईव्ह स्ट्रीमदरम्यान रियानने २०२१ मध्ये हर्षल पटेलसोबत मैदानात नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, २०२१ मध्ये मुंबईत खेळताना हर्षल पटेलने मला आरसीबीविरुद्ध जेव्हा आऊट केलं त्यावेळी मी शांतपण पॅव्हेलियनमध्ये परतत होतो तेव्हा त्याने इथून जा अशी कृती करत मला चिडवण्याचा प्रयत्न केला.

पण मी तेव्हा ते पाहिलं नव्हत. जेव्हा मी हॉटेलमध्ये परतलो त्यावेळीस मी रिप्ले पाहिला आणि तेव्हा ते मी पाहिलं. मात्र, त्याने केलेली कृती माझ्या डोक्यातून अजून गेलेली नाही. त्याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता त्याला मी त्याच्याच भाषेत उत्तर दिले असल्याचे रियानने म्हटलं आहे.

आयपीएलच्या अखेरच्या मॅचमध्ये हर्षलच्या चेंडूवर जोरदार फटकेबाजी केली आणि त्यावेळी त्याला मी त्याच कृतीतून उत्तर दिलं. ना त्याला मी कुठली शिवी दिली नाही ना त्याला मी काही बोलो. इतकेच घडले असल्याचे रियागने यावेळी म्हटलं.

रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?
तुझी साईज दुधीभोपळ्यासारखी! चहलची कुणी उडवली खिल्ली?

परागने या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने ३१ चेंडूवर नाबात ५६ धावांची खेळी केली होती. यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. पटेलने अखेरची ओव्हर फेकली होती त्याच्या चेंडूवर रियागने १८ धावा केल्या. राजस्थानने १४५ धावांचे आवाहन आरसीबीला दिलं होते. मात्र, आरसीबीला केवळ ११५ धावांपर्यतच मजल मारता आली. राजस्थानने हा सामना २९ धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.