Taniya Bhatia Indian Women's Cricket Team : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तेथे भारतीय संघाने टी 20 आणि वनडे मालिका खेळली. भारताने इंग्लंडविरूद्धच्या तीनही वनडे जिंकून मालिका खिशात घातली. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात दिप्ती शर्माने चार्ली डीन्सला मंकडिंग पद्धतीने बाद केल्याने वाद निर्माण झाला होता. हा वाद शमतोय न शमतोय तोच भारतीय संघाची विकेटकिपर तानिया भाटिया हिच्या हॉटेल रूममध्ये काही अज्ञात लोक घुसले आणि त्यांनी तानिया भाटियाचे किमती सामान चोरले. तानियाने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. (Robbery In Indian Women's Cricket Team Player Taniya Bhatia hotel Room belongings were stolen in England)
तानिया भाटियाने ट्विट केले की, 'मी मॅरियट हॉटेल व्यवस्थापनाने निराश केलं. माझ्या रूममधून माझ्या किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत. रोख रक्कम, घड्याळ आणि दागिन्यांचा समावेश असलेली बॅग चोरीला गेली आहे. मॅरियट हॉटेलमध्ये कोणतीही सुविधा नाही. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल अशी आशा आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या आवडत्या हॉटेलमध्ये अशी घटना होणे ही आश्चर्याची बाब आहे. आशा आहे की ते याची दखल घेतील.'
तानिया भाटियाला या दौऱ्यात एकही वनडे किंवा टी 20 सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 25 वर्षीय तानिया भाटियाने भारताकडून दोन कसोटी सामने, 19 वनडे आणि 53 टी 20 सामने खेळले आहेत. दरम्यान, इंग्लंडमधील हा दौरा अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचा शेवटचा दौरा होता. भारतीय संघाने इंग्लंडला 3 - 0 असा व्हाईट वॉश देत झुलनची निवृत्ती स्मरणीय केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.