BCCI Election : रॉजर बिन्नी बिनविरोध BCCI अध्यक्ष होणार; राजीव शुक्लांनीच दिले संकेत

BCCI President Election
BCCI President Election esakal
Updated on

BCCI President Election : बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याचे संकेत सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज ( दि. 11) दिले. एएनआयने केलेल्या ट्विटनुसार राजीव शुक्ला यांनी सांगितले की, 'मी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदासाठी, रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी, जय शहा यांनी सचिव पदासाठी आणि आशिष शेलार यांनी खजानीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्याच्या घडीला तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.'

BCCI President Election
IND vs SA : कुलदीप - सिराज सगळे गोलंदाज 'एकदम ओके', आफ्रिका 100 च्या आत घरात

रॉजर बिन्नी हे भारताचे माजी क्रिकेटपटू असून ते 1983 ला भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाचेही सदस्य राहिले आहेत. ते सौरभ गांगुलीनंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. बिन्नी हे सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी बीसीसीआयच्या निवडसमितीचे सदस्यपदही भुषवले आहे. सौरभ गांगुली 2019 मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष झाला होता. तो आता आयसीसीच्या चेअरमन पदासाठी इच्छुक आहे. ही निवडणूक लवकरच होणार आहे.

BCCI President Election
Kanak Indersingh Gurjar : अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन

दरम्यान, आज बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी 18 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे बिनविरोध अध्यक्ष होण्याची शक्यता बोलून दाखवली. रॉजर बिन्नी यांच्याबरोबर जय शहांनी सचिवपदासाठी, राजीव शुक्लांनी पुन्हा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या आशिष शेलार यांनी खजानीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्याचे खजानीस अरूण धुमल यांना आयपीएल कार्यकारणीत मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 11 आणि 12 ऑक्टोबर आहे. या अर्जांची छाननी 13 ऑक्टोबरला होईल त्यानंतर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.