T20 World Cup: BCCI ने दिला इशारा...! रोहित शर्मा अन् विराट कोहली T20 वर्ल्ड कप खेळणार?

Team India T20 Squad Against Afghanistan News |
Team India T20 Squad Against Afghanistan Marathi News
Team India T20 Squad Against Afghanistan Marathi Newssakal
Updated on

Team India T20 Squad Against Afghanistan News : अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 वर्षांनंतर परतले आहेत. या दोघांनी 2022 च्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, परंतु त्यानंतर त्यांना टी-20 क्रिकेटमधून ब्रेक देण्यात आला होता.

अफगाणिस्तानविरुद्ध रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करणार असून विराट कोहलीलाही या संघात स्थान मिळाले आहे. निवड समितीच्या या निर्णयानंतर हे दोघेही या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप खेळणार असे दिसत आहे.

Team India T20 Squad Against Afghanistan Marathi News
Ind vs Afg T20 Team India Squad : टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा झाला कर्णधार, विराटचेही पुनरागमन; जाणून घ्या संपूर्ण संघ

रोहित आणि विराट या वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही अशी चर्चा भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून होती. याचे कारण म्हणजे दोघेही 14 महिन्यांसाठी टी-20 इंटरनॅशनलमधून ब्रेकवर होते. अफगाणिस्तान मालिकेसाठी निवडल्यानंतर दोघांचेही भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या नियोजनात असल्याचे दिसत आहे.

Team India T20 Squad Against Afghanistan Marathi News
Ind vs Agf : दुखापतीचं कारण पुढे आलं अन् सूर्यकुमार, पांड्या, गायकवाडचं नाव टी-20 मालिकेतून वगळलं

काही दिवसांपूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले होते की, रोहितने टी-20 वर्ल्ड कपमधील त्याच्या भूमिकेबाबत निवडकर्त्यांना स्पष्टपणे विचारले होते. तो खेळला तर कर्णधार होणार की नाही, असा सवाल त्यांनी केला होता. आता रोहितसोबत विराटनेही निवडकर्त्यांना सांगितले होते की, तो T20 वर्ल्डकपसाठी पूर्णपणे उपलब्ध आहे. साहजिकच, हे दोघेही टी-२० वर्ल्ड कपमध्ये थेट खेळू शकत नाहीत, त्यामुळे निवडकर्त्यांनी दोघांनाही अफगाणिस्तान मालिकेत तयारीसाठी संधी दिली आहे.

अफगाणिस्तान मालिकेत या दोघांच्या निवडीवरून असे दिसून येते की, निवडकर्ते या दोघांचा टी-२० वर्ल्ड कपसाठी विचार करत आहेत, परंतु अंतिम निर्णय इतर काही गोष्टींवरही अवलंबून आहे.

रोहित आणि विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कसा खेळतात आणि आगामी आयपीएलमध्ये या दोघांचा फॉर्म कसा आहे, यावरही निवड समितीची नजर असेल.

त्याआधारे या दोघांचे वर्ल्ड कप खेळणे अंतिम असेल, मात्र सध्याच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, निवड समिती या दोघांकडे टी-20 वर्ल्ड कप साठी पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.