नवी दिल्ली- यूएसए आणि वेस्ट इंडिजमधील टी-२० वर्ल्ड कप २०२४ भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी अखेरचे ठरण्याची दाट शक्यता आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, विराट कोहली आपली महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. असे असले तरी वर्ल्डकपनंतर दोन्ही स्टार खेळाडू टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.
स्पोर्ट्स तकच्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या २०२४ च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आपली अंतिम कामगिरी दाखवतील. आयसीसीची ट्रॉफी जरी मिळाली तरी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दोन्ही खेळाडू रामराम ठोकतील. त्यामुळे देशभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशेची बाब आहे असंच म्हणावं लागेल. ( Rohit Sharma And Virat Kohli To Retire)
२०२४ च्या वर्ल्डकपमध्ये भारत ग्रुप A मध्ये असून भारताचा सामना पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि युनायडेट स्टेट्स यांच्यासोबत होणार आहेत. सेमीफायनल २६ आणि २७ जून रोजी अनुक्रमे गुयाना आणि त्रिनिदान येथे होणार आहे. त्यानंतर २९ जून रोजी केसिंगटन येथे फायनल सामना होईल. त्यामुळे या सामन्यांची चाहत्यांना आतुरतेने प्रतिक्षा आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० सिरिजमध्ये पुनरागमन केलं होतं. २०२४ च्या वर्ल्डकप आधीची त्यांची ही शेवटची टी-२० ठरली. हार्दिक पांड्या याच्या दुखापतीच्या कारणास्तव टी-२० टीमचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे दिल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे, विराट कोहली याने आयपीएलच्या सामन्यांमधील कामगिरीने टीकाकारांचे तोंड बंद केलं आहे. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट कमी झाला आहे हे दिसून येत आहे.
विराट कोहलीला टी-२० वर्ल्डकपच्या टीममध्ये घेण्यास रोहित शर्मा उत्सुक होता, असं स्पोर्ट्स तकच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. ३५ वर्षीय विराटने २५ सामन्यांमध्ये ११४१ धावा केल्या आहेत. ज्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर रोहित शर्माने ३६ सामन्यांमध्ये ९६३ धावा केल्या आहेत. ज्यात नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.