Wi vs Ind : पदार्पणाच्याच सामन्यात ईशान किशनवर कर्णधार ड्रेसिंग रूममधून भडकला! रागाच्या भरात घेतला हा निर्णय

Rohit Sharma angry Ishan Kishan
Rohit Sharma angry Ishan Kishan
Updated on

Rohit Sharma on Ishan Kishan : डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत संघाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव करत टीम इंडिया जिंकली आहे. हा सामना फक्त तीन दिवसात संपला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 5 विकेट गमावत 421 धावा करून डाव घोषित केला. कर्णधार रोहित शर्माचा निर्णय धक्कादायक होता, कारण कसोटी पदार्पण करणारा इशान किशन 20 चेंडूत एक धाव खेळत होता.

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. यजमान संघाच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष काही करता आले नाही. संघ 130 धावांवर बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा आणि अंतिम सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे 20 जुलैपासून खेळवला जाणार आहे.

Rohit Sharma angry Ishan Kishan
Wi vs Ind: 'एकही मारा लेकिन सॉलिड मारा' विंडीजला धूळ चारत टीम इंडिया WTC पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1

रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ईशान किशनच्या फलंदाजीवर नाराज असल्याचे दिसत आहे, त्यानंतर त्याने लगेचच डाव घोषित करण्याचे संकेत दिले. ईशानची ही पदार्पणाची कसोटी होती. अशा परिस्थितीत त्याच्याकडून वेगवान फलंदाजी अपेक्षित होती, कारण त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 250 धावांची खेळी केली आहे. त्याचा स्ट्राइक रेट 69 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक ठोकले आहे.

Rohit Sharma angry Ishan Kishan
Team India : टीम इंडियाची घोषणा अन् दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली? ब संघातही मिळाले नाही स्थान

यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या 5 कसोटीत केएस भरतला फलंदाजीत काही खास दाखवता आले नाही. याच कारणामुळे ईशानला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी मिळाली. त्याने 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 510 धावा केल्या आहेत. 210 धावा ही यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 653 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील हा पहिलाच सामना होता. त्याला पूर्ण 12 गुण मिळाले असून 100 टक्के गुण आहेत. यासह हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 2 जिंकले आहेत तर एकात पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियला 61 टक्के गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ 28 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजला आतापर्यंत एकही गुण मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.