Rohit Sharma Comment After Lost In WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने ओव्हवलर भारताचा 209 धावांनी पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपदाची गदा पटकावली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. तर भारताला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. कांगारूंनी पहिल्या डावात 173 धावांची दणदणीत आघाडी घेतली होती. त्यानंतर आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित करत भारतासमोर 444 धावांचे मोठे आव्हान ठेवले. भारत चौथ्या डावात सकारात्मक खेळला. मात्र त्याला 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताचा 209 धावांनी पराभव झाला.
भारताला सलग दुसऱ्या WTC फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला आहे. पहिल्या WTC Final मध्ये न्यूझीलंडने तर दुसऱ्या फायनलमध्ये त्यांचा शेजारी देश ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचं कुठं चुकलं हे सांगितलं.
सामन्यानंतरच्या कार्यक्रामात रोहित म्हणाला की, 'माझ्या मते आम्ही नाणेफेक जिंकून चांगली सुरूवात केली. परिस्थिती पाहता आम्ही त्यांना फलंदाजीला पाचारण केले. आम्ही पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर आमचे गोलंदाज कमी पडले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना देखील श्रेय द्यावं लागेल. ट्रेविस हेड आला आणि त्याने खूप चांगली खेळी केली. त्याने स्मिथसोबत भागीदारी रचली. यामुळे आम्ही सामन्यावरील आमची पकड गमावली.'
रोहित पुढे म्हणाला की, 'आम्हाला माहिती होतं की इथून सामन्यात पुनरागमन करणे अवघड आहे. मात्र आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचे आणि झुंज कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेवटपर्यंत लढलो.'
रोहितच्या मतानुसार ओव्हलची खेळपट्टी नंतर फलंदाजीला चांगली होते. त्यामुळे त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित म्हणाला की, आम्ही पहिल्या डावात 150 ते 170 धावा कमी केल्या. आम्ही जर पहिल्या डावात त्यांच्या धावसंख्येच्या जवळ पोहचून लीड कमीतकमी ठेवले असते तर आम्हाला संधी असती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.