Rohit Sharma : लढावं तर रोहितसारखं! 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला अन्...

Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI
Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI esakal
Updated on

Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने भारताचा 5 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली. बांगलादेशने ठेवलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताने 50 षटकात 9 बाद 266 धावांपर्यंतच मजल मारली. बांगलादेशने मालिका जिंकली मात्र रोहित शर्माने मने जिंकली. दुखरा अंगठा घेऊन 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्माने 28 चेंडूत 51 धावा चोपत जवळपास विजय खेचून आणला होता. मात्र या झुंजारपणाला विजयाची झालर मिळाली नाही.

भारताकडून श्रेयस अय्यरने 83 धावांची झुंजार खेळी केली. त्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत जखमी रोहित शर्माने 28 चेंडूत नाबाद 51 धावा ठोकत अशक्यप्राय वाटणारा विजय आवाक्यात आणला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी कोणी उरलंच नाही. शेवटच्या चेंडूपर्यत रोहित लढला. मात्र अवघ्या 5 धावांनी भारत विजयापासून दूर राहिला. बांगलादेशकडून मुस्तफिजूरने 48 वे षटक निर्धाव टाकले. तसेच 50 व्या षटकात टिच्चून मारा करत रोहितचे मनसुबे उधळून लावले.

Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI
BAN vs IND 2nd ODI : 4, 4, 6, 1... जखमी वाघ रोहित शेवटपर्यंत लढला मात्र भारत हरला

भारताची अवस्था 42.2 षटकात 8 बाद 207 धावा अशी झाली असताना दुखऱ्या अंगठ्यानिशी कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडलेल्या भारतासाठी मैदानात उतरला. त्याने 46 व्या षटकात दोन षटकार आणि 1 चौकार मारत 18 धावा वसूल केल्या. त्यानंतर पुन्हा बांगालदेशी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले.

भारताला 24 चेंडूत 41 धावांची गरज असताना बांगलादेशने खुबीने रोहित शर्माला स्ट्राईकपासून दूर ठेवले. मुस्तफिजूनरे 48 वे षटक निर्धाव टाकले. यामुळे रोहित स्ट्राईकवर आला त्यावेळी भारताला 12 चेंडूत विजयासाठी 40 धावांची गरज होती. मोहमद्दुल्ला टाकत असलेल्या 49 व्या षटकात रोहितने दोन षटकारांसह 20 धावा केल्या. यात त्याला दोन जीवनदानही मिळाले. मात्र शेवटच्या चेंडूवर सिराज बाद झाला. सामना 6 चेंडूत 20 धावा असा आला होता. त्यावेळी हा शेवटच्या षटकातील थरार घडला.

Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI
Shikhar Dhawan : शेवटी गब्बरच तो.. कॅच हाताने नाही तर पकडला पायाने; VIDEO व्हायरल

आता भारताला विजयासाठी 6 चेंडूत 20 धावांची गरज होती.

1 - मुस्तफिजूरने पहिला चेंडू निर्धाव टाकला.

2 - रोहितने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. सामना चार चेंडूत 16 धावा..

3 - तिसरा चेंडूवर रोहितने अजून एक चौकार मारत सामना 3 चेंडूत 12 धावा असा आणला...

4 - मुस्तफिजूरने हा चेंडू निर्धाव टाकत रोहितवर दबाव टाकला. आता सामना 2 चेंडू 12 धावा असा आला होता.

5 - रोहितने समोर षटकार मारत सामना 1 चेंडू 6 धावा असा आणला.

6 - शेटवच्या चेंडूवर मात्र रोहितला षटकार मारण्यात अपयश आले अन् बांगलादेशने मालिका जिंकली.

Rohit Sharma India Vs Bangladesh 2nd ODI
Sanju Samson : सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या संजूला मिळाली ऑफर; आता आयर्लंडकडून खेळणार?

तत्पूर्वी, बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 271 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने नाबाद शतकी तर मोहम्मदुल्लाने 77 धावांची झुंजार खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरूवातीला बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत त्यांची अवस्था 6 बाद 69 धावा अशी केली होती. मात्र मेहदी हसन मिराझने मोहम्मदुल्लाच्या (77) साथीने सातव्या विकेटसाठी 147 धावांची दमदार भागीदारी रचली.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.