Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश सामन्यात 257 धावांचे आव्हान पार करताना भारताने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने तर बांगलादेशी गोलंदाजांना तडाखे देत शुभमन गिल सोबत 88 धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे आजच्या सामन्यातच त्याने न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे आणि मोहम्मद रिझवानला मागे टाकत यंदाच्या वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला.
रोहित शर्माने वर्ल्डकप 2023 मधील 4 इनिंगमध्ये 84.66 च्या सरासरीने 254 धावा केल्या आहेत. तर डेवॉन कॉनवेने 83 च्या सरासरीने 249 आणि मोहम्मद रिझवानने 3 डावात 124 च्या सरासरीने 248 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा हा 2019 च्या वर्ल्डकपमध्ये देखील सर्वाधिक धावा केल्या होत्या. यंदा देखील सध्या तो अव्वल स्थानावर आहे.
रोहित शर्माने बांगलादेशचे 257 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरताच आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्याने भारताला 9 व्या षटकातच अर्धशतक पार करून दिले. यात रोहितचा मोलाचा वाटा होता. रोहितने शुभमन गिल सोबत 88 धावांची भागीदारी रचली. त्यात रोहितने 40 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले.
मात्र या 48 धावांमधील 40 धावा या फक्त 9 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांनीच पूर्ण केल्या होत्या. शुभमन गिलने सावध सुरूवातीनंतर दमदार फलंदाजी केली. तो रोहित शर्माच्या जवळ पोहचला होता. रोहित बाद झाल्यानंतर त्याने 55 चेंडूत 53 धावा केल्या.
रोहित बाद झाल्यानंतर गिल आणि विराट कोहलीने 40 धावांची भागीदारी रचली. मात्र मिराजने गिलला बाद करत ही जोडी फोडली. विराट कोहलीने रोहित आणि गिलने सेट केलेली धावगती पुढे नेण्याचा प्रयत्न करत 23 षटकात भारताचे दीडशतक पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.