सहा वर्षात त्याच्या नावावर विशेष असा कोणताच रेकॉर्ड नोंदवला गेला नाही. त्यानंतर २०१३ साल उजाडलं आणि सगळंच बदलून गेलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं ओपनिंग केली आणि त्यानंतर इतिहास घडला. त्याची ओळख आता डबल सेंच्युरी मशीन आणि आयपीएलचा सर्वात यशस्वी कॅप्टन अशी बनली आहे.
वर्ष २००६ हा असा काळ होता, जेव्हा भारतीय क्रिकेटमधील युवा खेळाडूंविषयी बरीच चर्चा होती. त्याच्यासारखा प्रतीभावान खेळाडू भारताकडे नाही असंच त्यावेळी म्हटलं जात होतं. एक वर्षानंतर त्यानं जेव्हा टीम इंडियात पदार्पण केलं ते वनडे सामन्यात. टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं तेदेखील थेट वर्ल्डकपमध्येच. ही तीच मॅच होती, ज्या मॅचमध्ये सिक्सर किंग युवराजने एका ओव्हरमध्ये सहा सिक्सचा पाऊस पाडला होता. सुरवातीच्या काही सामन्यात त्यानं लोकांचं लक्ष वेधूनही घेतलं. पण त्यानंतरच्या सहा वर्षात त्याच्या नावावर विशेष असा कोणताच रेकॉर्ड नोंदवला गेला नाही. त्यानंतर २०१३ साल उजाडलं आणि सगळंच बदलून गेलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं ओपनिंग केली आणि त्यानंतर इतिहास घडला. त्याची ओळख आता डबल सेंच्युरी मशीन आणि आयपीएलचा सर्वात यशस्वी कॅप्टन अशी बनली आहे. त्याचं नाव हिटमॅन रोहित शर्मा. रोहितचा आज वाढदिवस. ३० एप्रिल १९८७मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे त्याचा जन्म झाला.
मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवल्यानंतर २००७मध्ये आयर्लंड दौऱ्यासाठी रोहितची टीम इंडियात निवड झाली. पण पहिल्या मॅचमध्ये तो बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकला नाही. तेव्हा तो चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या नंबरवर खेळायचा. परिणाम असा झाला की, २००७ मध्ये पदार्पण होऊनही तीन वर्षात त्याला शतक ठोकता आलं नाही. २०१० मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर सलग दोन मॅचमध्ये शतके ठोकली. पुन्हा तीन वर्षे त्याला शतक करता आलं नाही. रोहितच्या टॅलेंटची त्यावेळी सोशल मीडियात टर उडवली जात होती.
धोनीनं घेतला निर्णय
२०१३ मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीने रोहितला शिखर धवनसोबत ओपनिंग करण्यास सांगितले. त्यानंतर रोहितनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षाचा शेवट होईपर्यंत त्याने अनेक विक्रम रचले होते. २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले त्याच्या कारकीर्दीतले तिसरे शकत होते. आणि काही दिवसातच त्याने वनडेमध्ये डबल सेंच्युरीही ठोकली. असा कारनामा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. आतापर्यंत त्यानं तीन डबल सेंच्युरी झळकावल्या आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आज परिस्थिती अशी आहे की रोहितनं फिफ्टी साजरी केली की लोकांच्या नजरा त्याच्या डबल सेंच्युरीकडे लागतात. आतापर्यंत त्यानं २९ वनडे शतके झळकावली आहेत. आणि जगातील धुवाधार फलंदाजांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन विराट कोहलीला रोहितच टक्कर देत असल्याचे सध्यातरी दिसत आहे.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या पहिल्या सहा वर्षात १०३ मॅचमध्ये त्यानं फक्त २ शतकं केली होती. त्यानंतर पुढच्या आठ वर्षात ११४ मॅचमध्ये त्यानं २७ शतकं ठोकली आहेत. म्हणजे प्रत्येक चौथ्या मॅचमध्ये शतक. वनडे क्रिकेट इतिहासात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्याही (२६४) रोहितच्या नावावर आहे.
टी-२०मध्येही जलवा
टी-२० फॉरमॅटमध्येही रोहितचा जलवा राहिला आहे. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं नाबाद ५० रन्सची खेळी केली होती. २००७ टी-२० वर्ल्डकपच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं ही खेळी केली होती. इथंही २०१३मध्येच धोनीनं रोहितलाच ओपनिंग करण्यास सांगितलं. आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक चार शतकं ठोकण्याचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे. बॅटमधून धावांचा पाऊस पाडणाऱ्यांच्या यादीतही तो कोहलीच्या पाठीमागेच आहे.
चांगल्या सुरवातीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये कामगिरी घसरली
२०१३मध्ये टेस्ट क्रिकेट कारकीर्दीची सुरवात तुफानी केली. पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये त्यानं सलग दोन शतके झळकावली. पण त्यानंतर त्याचा खेळच बदलला. २०१९पर्यंत त्याला टेस्ट टीममध्ये जागाच मिळाली नाही. पण २०१९च्या वर्ल्डकपमध्ये ५ शतके ठोकल्यानंतर टेस्टमध्येही तो ओपनिंगला खेळण्यासाठी आला. त्यानंतर आतापर्यंत त्यानं तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने आतापर्यंत ३८ टेस्ट मॅचमध्ये ४६.६९च्या सरासरीने सात शतकांसह २६१५ रन्स कुटल्या आहेत. २२७ वनडेमध्ये ४८.९६च्या सरासरीने आणि २९ शतकांसह ९२०५ रन्स केल्या आहेत. तर ११ टी-२० मॅचमध्ये ३२.५४च्या सरासरीने चार शतकांसह २८६४ रन्सचा पाऊस पाडला आहे.
आयपीएलमध्ये दबदबा
मुंबई इंडियन्स टीमच्या कॅप्टनशिपची धुरा सांभाळणाऱ्या रोहितने आयपीएलमध्ये दबदबा राखला आहे. २०१३नंतरच त्याचं नशीब उजळलं. याच वर्षी तो मुंबई टीमचा कॅप्टन बनला. आणि आठ वर्षात त्यानं पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.