Rohit Sharma World Cup Records : भारताचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात आक्रमस शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मोडले. त्याने वर्ल्डकपमध्ये आपले सातवे शतक झळकावत सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 6 शतके ठोकण्याचा विक्रम मागे टाकला. याचबरोबर रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा आणि वर्ल्डकपमध्ये वेगवान 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला.
रोहित शर्माने वर्ल्डकपमधील विक्रमी सातवे शतक ठोकल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या लाडक्या कॅप्टनसाठी खास पोस्ट केली. मुंबई इंडियन्सने रोहितचा फोटो शेअर करत कॅप्शन दिले की 'जरी वर्ल्डकपमध्ये 1975 पासून शतक साजरं करण्यासाठी बॅट उंचावली जात असेल मात्र सातवेळा असं करणारा एकमेव व्यक्ती आहे.'
रोहित शर्माने आज अफगाणिस्ताविरूद्ध विक्रमांची मालिकाच लावली. त्याने सर्वात आधी भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर रोहितने 30 चेंडूत अर्धशतक ठोकले.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला 554 वा षटकार मारला. याचबरोबर त्याने ख्रिस गेलचे सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. आपला आक्रमक अंदाज कायम ठेवत रोहित शर्माने आपले 31 वे वनडे शतक देखील पूर्ण केले.
या शतकासोबतच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याचे ही वनडे वर्ल्डकपमधील सातवे शतक होते. यापूर्वी मुंबईच्याच सचिन तेंडुलकरने शतक वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 6 शतके ठोकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.