IND vs WI 2nd Test: प्लेइंग-11 मध्ये फक्त एक बदल अन् टीम इंडिया दुसरी कसोटीही 3 दिवसात जिंकणार

IND vs WI 2nd Test
IND vs WI 2nd TestSAKAL
Updated on

IND vs WI 2nd Test Playing 11 : डॉमिनिका कसोटीत वेस्ट इंडिजचा 3 दिवसांत पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाचा पुढचा सामना पोर्ट ऑफ स्पेनवर होणार आहे. 20 जुलैपासून येथे उभय देशांमधील दुसरा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने एकूण 12 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसापासून डॉमिनिकामध्ये चेंडू फिरत होता.

पोर्ट ऑफ स्पेनमध्येही खेळपट्टीचा मूड तसाच राहू शकतो. अशा स्थितीत टीम इंडिया केवळ 3 दिवसांत दुसरी कसोटी जिंकू शकते. फक्त प्लेइंग-11 मध्ये बदल करावा लागेल आणि दोन ऐवजी तीन फिरकीपटू उतरवावे लागतील. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड दुसऱ्या कसोटीतही असाच विचार करत असतील.

IND vs WI 2nd Test
Team India: द्रविडबाबत BCCI घेणार मोठा निर्णय! आयर्लंड दौऱ्यावर फक्त टीमच नाही तर संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील डॉमिनिका कसोटीत 25 पैकी 20 विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या. यापैकी आर अश्विनने (5/60 आणि 7/71) एकूण 12 बळी घेतले. त्याचवेळी रवींद्र जडेजानेही 5 विकेट्स घेतल्या. डॉमिनिका कसोटीत 8व्या षटकापासूनच चेंडू फिरू लागला आणि खेळपट्टीवरून धूळ उडू लागली. म्हणजेच या विकेटवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहणार हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले होते.

पोर्ट ऑफ स्पेनमधील खेळपट्टीचा मूडही डॉमिनिकासारखाच असू शकतो. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीत अक्षर पटेललाही संधी देऊ शकते. म्हणजेच दुसऱ्या कसोटीत भारत 3 फिरकीपटूंसह उतरू शकतो. असे झाले तर ही कसोटीही टीम इंडिया अवघ्या 3 दिवसांत जिंकू शकते.

IND vs WI 2nd Test
Duleep Trophy : सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी; पश्‍चिम विभागावर मात करत दक्षिण विभागाने पटाकावले विजेतेपद

पोर्ट ऑफ स्पिन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे शेवटची कसोटी 2018 मध्ये झाली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा 226 धावांनी धुव्वा उडवला. त्या कसोटीच्या विकेटवर पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत झाली तर शेवटचे दोन दिवस फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र त्यानंतर येथे एकही कसोटी सामना झाला नाही. अशा स्थितीत येथे काय स्थिती असेल, हे सध्याच सांगता येणार नाही.

IND vs WI 2nd Test
Wimbledon Final 2023 Video: फायनलमध्ये जोकोविच भलताच संतापला, रागाच्या भरात मोडले रॅकेट अन्...

क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जुलै 2022 मध्ये झाला होता. भारताने हा सामना 119 धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात एकूण 13 विकेट पडल्या, त्यापैकी 8 फिरकी गोलंदाजांनी घेतले. युजवेंद्र चहलने 4 विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. त्या सामन्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास क्वीन्स पार्क ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करू शकते. अशा स्थितीत अक्षरला संधी मिळू शकते. अक्षरने 12 कसोटीत 50 बळी घेतले आहेत.

आता प्रश्न असा पडतो की जर अक्षर पटेल प्लेइंग-11 मध्ये खेळला तर कोण बाहेर जाणार. पहिल्या कसोटीत भारत तीन वेगवान गोलंदाजांसह खेळला होता. मोहम्मद सिराजसोबत शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट होते. शार्दुलने विकेट घेतली. अशा स्थितीत उनाडकटला बाहेर बसवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.