Rohit Sharma WTC Final : रोहितची कॅप्टन्सी, स्वैर गोलंदाजी ते चुकलेली फटकेबाजी; ही आहे पराभवाची 5 कारणं

WTC Final 2023 5 Reasons Of India Defeat
WTC Final 2023 5 Reasons Of India Defeatesakal
Updated on

WTC Final 2023 5 Reasons Of India Defeat : गेल्या दोन वर्षापासून दमदार कसोटी क्रिकेट खेळणारा भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे WTC Final मध्ये पोहचला. सलग दुसऱ्यांदा WTC फायनल खेळणाऱ्या भारतीय संघाचा यंदा सामना हा कडवट ऑस्ट्रेलियाशी झाला. हा सामना पाच दिवसापर्यंत रंगला ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताचा धावांनी पराभव करत WTC Final वर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. भारताचे सलग दुसऱ्यांदा WTC Final जिंकण्याचे स्वप्न भंगले. भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न दशकभरापासून अधुरे होते ते आताही अधुरेच राहिले.

यंदाच्या WTC Final मध्ये नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. रोहितने ओव्हलच्या फ्रेश विकेटवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने कांगारूंना सामना सुरू झाल्यावरच पहिला धक्का दिला होता. सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या सत्रात खेळपट्टी फलंदाजीला सोपी झाली अन् भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा करण्यास सुरूवात केली.

ट्रेविस हेड आणि स्मिथने बघता बघता पहिल्या दिवसअखेरच ऑस्ट्रेलियाला 300 च्या पार पोहचवले. सामना इथंच भारताच्या हातून निसला. मात्र तरी देखील भारताने प्रत्येक दिवशी कांगारूंना कडवा प्रतिकार करत आपली सकारात्मक वृत्ती दाखवली.

चौथ्या डावात भारताला 444 धावांचा डोंगर पार करायचा होता. भारतीय फलंदाजांनी एवढी मोठी धावसंख्या चेस करताना लागणारी ती इच्छाशक्ती दाखवली. मात्र सामना फक्त इच्छाशक्तीवर जिंकता येत नाही. भारताने या सामन्यात अनेक चुका केल्या त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

WTC Final 2023 5 Reasons Of India Defeat
Rohit Sharma WTC Final 2023 : रोहितने आपल्या निर्णयाचे केले समर्थन, म्हणाला नाणेफेक जिंकली अन्...

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांना टप्पाच सापडला नाही

रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फ्रेश होती, हिरवं गवत होतं त्यामुळे हा निर्णय योग्यच होता. मात्र पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला परंतु त्यांना विकेट्स घेण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात जर भारताने तीन - चार विकेट्स घेतल्या असत्या तर सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटले असते.

मात्र पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा करत ट्रेविस हेडला आक्रमक फलंदाजी करण्याची मुभा दिली. हेडने 163 आणि स्मिथने 121 धावांची खेळी करत पहिल्याच डावात कांगारूंना 469 धावा करून दिल्या. यात अॅलेक्स कॅरीने 48 धावांचे योगदान दिले. भारताने सामना इथंच गमावला होता.

रोहितची कॅप्टन्सी वादाच्या भोवऱ्यात

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याच्या निर्णयाबाबत टीका झाली. मात्र सामना जसजसा पुढे सरकत गेला तसतसे दिसून आले की रोहितचा निर्णय योग्य होता. कारण पहिल्या दिवसाचे पहिले सत्र सोडले तर गोलंदाजांना खेळपट्टीने खूप मदत केली आहे असं कधी दिसलं नाही.

रोहितने पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाजांना मोठे स्पेल देऊन देखील चूक केली. जर शॉर्ट स्पेल दिले असते तर त्यांना ब्रेक मिळाला असता अन् फलंदाजाला देखील एकाच गोलंदजाविरूद्ध सेट होण्याची संधी मिळाली नसती.

मात्र रोहितचा संघ निवडीबाबत एक मोठा जुगार खेळला. त्याने आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेल्या अश्विनला बेंचवर बसवत डावखुऱ्या रविंद्र जडेजाला संधी दिली. रोहितने जडेजाच्या डावखुऱ्या फलंदाजीवर जास्त फोकस केला. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघात तब्बल 5 फलंदाज हे डावखुरे आहेत.

त्यांना बाद करण्याची चांगली संधी ही एका ऑफ स्पिनरकडेच असते याकडे दुर्लक्ष केले. सामन्याच्या स्कोअरकार्डवर नजर टाकली तर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजांनीच चांगल्या धावा केल्याचे दिसून येईल.

हेडने पहिल्या डावात 163 धावा केल्या, डेव्हिड वॉर्नरने 43 तर अॅलेक्स कॅरीने 48 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात देखील अॅलेक्स कॅरीने नाबाद 66 तर मिचेल स्टार्कने 41 धावा केल्या आहेत. हे सर्व फलंदाज भारतासाठी डोकेदुखी ठरले. जर अश्विन असता तर नक्कीच फरक पडला असता.

चुका सुधारल्या पण वेळ गेल्यावर

पहिल्या दोन दिवसात भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी देखील केलेल्या चुका नंतर सुधारल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करत ऑस्ट्रेलियाला 500 धावांच्या आत रोखले. तरी पहिल्या डावात 469 धावा या जास्तच होत्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात देखील भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात करत निम्मा संघ 124 धावात गारज केला. मात्र परत अॅलेक्स कॅरी आणि स्टार्कची भागीदारी फोडण्यात अपयश आले अन् कांगारूंनी आवाक्या बाहेरची आघाडी घेतली.

फलंदाजीत पहिल्या डावात 4 बाद 71 धावा अशी अवस्था झाली असताना अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजाने डाव सारवला. मात्र दिवस संपत आला असताना जडेजाने बाहेरच्या चेंडूशी छेडछाड केली अन् त्याचा फटका भारताला बसला. तिसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर आणि अजिंक्यने 109 धावांची भागीदारी रचली खरी मात्र भारताला 296 धावांपर्यंतच मजल मारता आली.

अजिंक्य 89 धावांवर बाद झाला. शार्दुलही 51 धावा करून माघारी फिरला. पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी चेंडू सोडताना विकेट कव्हर न करण्याची चूक केली अन् त्याचा फटका त्यांना बसला.

दुसऱ्या डावात 444 धावांचा पाठलाग करतानाही भारतीय संघाने सकारात्मक मानसिकता दाखवली. मात्र आक्रमक खेळतानाही फटक्यांची निवड जर चांगली केली असती तर सामना अजून शेवटपर्यंत घेऊन जाता आला असता.

रोहित स्विप मारताना बाद झाला तर पुजारा अप्पर कट मारताना विकेट गमावून बसला. विराट कोहली पुन्हा एकदा सेट झाला अन् सहाव्या स्टम्पवरील चेंडूवर कव्हर ड्राईव्ह मारत बाद झाला. जर इथं चांगली भागीदारी झाली असती तर भारताने कदाचित 444 धावा चेस करून इतिहास देखील रचला असता.

WTC Final 2023 5 Reasons Of India Defeat
WTC India Defeat Memes : 'या चिमण्यांनो परत फिरा रे!' छान खेळलात, भारतात निघून या, नेटकऱ्यांनी झापले

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर गुंडाळण्यात अपयश

ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात 469 धावा ठोकल्यानंतरही भारताला सामन्याचे पारडे झुकवता आले असते. त्या दृष्टीने भारतीय गोलंदाजांनी सुरूवात देखील केली होती. त्यांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची 5 बाद 124 धावा अशी अवस्था केली होती. मात्र पुन्हा अॅलेक्स कॅरी आणि स्टार्कने 93 धावांची भागीदारी रचली आणि कांगारूंना 250 च्या पार पोहचवले.

जर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 च्या आत गुंडाळले असते तर भारताला जवळपास 350 चे टार्गेट आले असते. मात्र तसं झालं नाही अन् भारताला आवाक्या बाहेरचं 444 धावांच टार्गेट मिळालं.

दिग्गज फलंदाजांनी आयपीएल स्टाईल फलंदाजी इतिहास रचण्याची संधी गमावली

जरी ऑस्ट्रेलियाने 444 धावांचे टार्गेट दिले असले तरी खेळपट्टी आणि भारताकडे असलेली दर्जेदार फलंदाजी पाहता हा चमत्कार भारतीय संघ करू शकला असता. त्या दृष्टीने भारतीय फलंदाजांनी सुरूवात देखील केली होती. मात्र एकाही फलंदाजाला मोठी शतकी खेळी करण्यात यश आले नाही. भारताचे अव्वल फलंदाज खराब फटके मारून सेट होऊन बाद झाले.

जर भारताच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी केली असती तर कदाचित सामना जिंकून इतिहास रचता देखील आला असता. भारताने दुसऱ्या डावात जवळपास 64 षटकात 234 धावा केल्या. भारताचा ऑल आऊट झाला त्यावेळी अजून दिवसाची दोन सत्रे म्हणजे 60 षटके शिल्लक होती. यात 209 धावा करायच्या होत्या.

खेळपट्टीवर चेंडू असमान उसळतोय किंवा खूप टर्न होतोय असं काही दिसलं नाही. त्यामुळे जर दोन फलंदाजांनी मोठी खेळी केली असती तर पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवरही हा चमत्कार घडवता आला असता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.