Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्मा दोन महिने टीम इंडियातून बाहेर? थेट आशिया चषकात परतणार

WTC मधील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत यादरम्यान...
Team India Rohit Sharma
Team India Rohit Sharma
Updated on

Team India Rohit Sharma : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कुठेतरी त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर कुठे त्याच्या वाढत्या वयाची आणि भविष्याबद्दल चर्चा होत आहे.

दरम्यान, आता क्रिकेटपंडितही त्याच्यावर आपली मते मांडत आहेत. अलीकडेच ग्रॅम स्मिथ, भारताचे माजी निवडकर्ते देवांग गांधी यांच्यासह अनेकांनी रोहितबाबत वेगवेगळी विधाने केली होती. आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे रोहित शर्मा आशिया कप 2023 च्या आधी दोन महिने विश्रांती घेणार आहे. हे आम्ही म्हणत नसून टीम इंडियाच्या वेळापत्रकानुसार ते समोर येत आहे.

Team India Rohit Sharma
Wrestlers Protest : 'तुम्ही बदामाच्या पिठाची भाकरी खाता... पण...' साक्षीच्या दाव्यावर बबिता फोगटची तिखट प्रतिक्रिया

रोहित शर्माने टी-20 विश्वचषक 2022 पासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. विराटने पण तेव्हापासून खेळला नाही, परंतु रोहितचा फॉर्म आयपीएलमध्ये देखील चर्चेचा विषय होता, जेव्हा विराटने दोन बॅक टू बॅक शतकांसह चमकदार कामगिरी केली होती.

त्याचबरोबर, वर्ल्डकपपासून फक्त हार्दिक पांड्याने टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. भविष्यातही त्याच्याकडे टीम इंडियाचा टी-20 कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत या वर्षी एकदिवसीय विश्वचषक आणि एकदिवसीय आशिया कप होणार आहे, त्या दृष्टीने रोहित शर्माचे टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणे खूप कठीण दिसत आहे.

Team India Rohit Sharma
Virat Kohli : मॅचशी देणं ना घेणं तरी अ‍ॅशेस दरम्यान विराटच्या नावाची चर्चा, काय आहे कारण

भारतीय संघ 11 जून रोजी ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरला होता. तेव्हापासून टीम इंडियाचे सर्व खेळाडू विश्रांतीवर आहेत. टीम इंडिया 12 जुलैपासून ठीक एक महिन्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील मालिका खेळणार आहे ज्यामध्ये 24 जुलैपर्यंत दोन कसोटी सामने खेळवले जातील. यानंतर 1 ऑगस्टपर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

रोहितसाठी या मालिकेत खेळणे कठीण आहे. त्यानंतर 31 ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होणार आहे ज्यामध्ये टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि पहिले चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. म्हणजेच सप्टेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात टीम इंडिया वनडे खेळणार आहे ज्यामध्ये रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो.

Team India Rohit Sharma
Team India : 'टीम इंडियाचे मोठे खेळाडू नेहमीच...' भारतीय अंपायरच्या वक्तव्याने उडाली खळबळ

म्हणजेच 1 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोहित पुन्हा महिनाभर विश्रांती घेणार आहे. येथे वेस्ट इंडिज मालिका सुरू होण्यास एक महिना आणि आशिया कपपर्यंत एक महिना. म्हणजेच रोहित शर्मा दोन महिने टीम इंडियाच्या बाहेर राहू शकतो.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा न झाल्यामुळे अजून काही सांगता येणार नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ 14 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. यातही रोहितला येणे अवघड आहे.

आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे निवडकर्ते यावर काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. आयर्लंड मालिकेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्याचवेळी आशिया चषक 2023 ची सुरुवात 31 ऑगस्टपासून होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.