Video Asia Cup 2022 : काही तरी सिक्रेट ठेवू द्या ना! पत्रकार परिषदेत रोहितचा मजेशीर अंदाज

Rohit Sharma Funny Answer In Press Conference Video Gone Viral Before India Vs Pakistan Match in Asia Cup 2022
Rohit Sharma Funny Answer In Press Conference Video Gone Viral Before India Vs Pakistan Match in Asia Cup 2022esakal
Updated on

Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 28 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. मात्र अंतिम 11 कोणती असेल आणि सलामीला कोण येणार या प्रश्नावर त्याने मजेशीर उत्तर दिले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Funny Answer In Press Conference Video Gone Viral Before India Vs Pakistan Match in Asia Cup 2022
Asia Cup 2022 : श्रीलंका सर करण्यात अफगाणिस्तानला लाभली 'पाकिस्तानी' मदत

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला त्याच्या सोबत उद्या सलामीला कोण येणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने दिलेल्या उत्तरामुळे पत्रकार देखील हसू लागले. त्याने 'माझ्या सोबत कोण सलामीला येणार हे उद्या नाणेफेकीनंतर बघा. आम्हालाही काही सिक्रेट ठेवू द्या की.' असे उत्तर दिले.

Rohit Sharma Funny Answer In Press Conference Video Gone Viral Before India Vs Pakistan Match in Asia Cup 2022
Virat Kohli : 'मानसिकदृष्ट्या खचलो होतो मात्र दाखवून द्यायचो नाही'

भारतीय संघातील सलामीवीर केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने फारसे क्रिकेट खेळू शकलेला नाही. दरम्यान, त्याच्या अनुपस्थितीत भारताने अनेक सलामीचे कॉम्बिनेशन ट्राय करून पाहिले होते. रोहित सोबत सलामीला ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांना देखील चाचपून पाहण्यात आले होते. त्यामुळेच रोहित उद्या कोणाच्या साथीने सलामीला उतरणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे.

विराटबद्दलही रोहित शर्मा बोलला

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबद्दल रोहित शर्माला विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'कोहली नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. मला नाही वाटत की विराट कोहलीला काही जास्त करावं लागेल. तो आधी जसा होता तसाच आहे. त्याने एक महिन्याचा ब्रेक घेतला होता आणि तो एकदम ताजा तवाना होऊन आला आहे.' याचबरोबर रोहितने दिनेश कार्तिक बद्दल देखील वक्तव्य केले. तो म्हणाला की, डीकेने संघाला कधी निराश केलेले नाही. त्याने पुनरागमनानंतर अनेक महत्वाच्या खेळी करून भारताला विजय मिळवून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.