Video : "अय्, आवाज येत नाही काय?"; रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळा

दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ अनेक चुका रोहित शर्माने धरला गळा व्हिडिओ
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

Rohit Sharma Dinesh Karthik : ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा धरला.

Rohit Sharma
Bhuvneshwar Kumar : स्लॉग ओव्हरमधला बिनकामाचा भुवनेश्वर; 'या' 5 कारणांमुळे भारत हरला!

अक्षर पटेलने कर्णधार अॅरॉन फिंचला लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवले. स्मिथ एलबीडब्ल्यू बाद झाला. पण दिनेश कार्तिकने कोणीही अपील केले नाही. त्यानंतर उमेश यादवच्या षटकात दोन्ही वेळा एज बाद करण्याचे अपील केले नाही. एकापाठोपाठ एक तीन चुका केल्यानंतर रोहितने कार्तिकवर चिडून त्याची गळा पकडली.

Rohit Sharma
IND vs AUS : भारताची सुरूवात अन् शेवटही खराब; कांगरूंनी घेतली आघाडी

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. संघाने तीन झेल सोडले. या पराभवात क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीही खराब होती. अक्षर पटेल वगळता सर्वांनी भरपूर धावा दिल्या.

अष्टपैलू हार्दिक पांड्या (नाबाद 71) आणि सलामीवीर केएल राहुल (55 धावा) यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव (46 धावा) करत भारताने 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाने ग्रीनचे अर्धशतक, स्टीव्ह स्मिथच्या 35 आणि वेडच्या 21 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 45 धावांच्या जोरावर 19.2 षटकांत सहा बाद 211 धावा करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाच्या सामन्यात टीम डेव्हिडने 18 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.