IND vs ENG : रोहित - हार्दिक नाहीत फॉर्ममध्ये; विराट - सूर्याच्या जीवावर टीम इंडिया किती तग धरणार?

Rohit Sharma Hardik Pandya Runs Drought T20 World Cup 2022 Team India Semi Final Challenges
Rohit Sharma Hardik Pandya Runs Drought T20 World Cup 2022 Team India Semi Final Challenges esakal
Updated on

Team India Semi Final Challenges : भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकपमध्ये आपल्या ग्रुपमधील 5 पैकी चार सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. भारत फक्त दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला. हीच दक्षिण आफ्रिका सुपर 12 फेरीत गारद झाली आहे. भारताने झिम्बाब्वेविरूद्धचा सामना खेळण्यापूर्वीच भारत सेमी फायनलमध्ये पोहचला होता. मात्र भारताने झिम्बाब्वेचा सामना जिंकून सुपर 12 मधील दोन्ही ग्रुपमध्ये सर्वाधिक 8 गुण घेत दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला. विराटने सुरू केलेला अर्धशतकांचा रतीब, सूर्याची सामना फिरवण्याची अजून खुलून आलेली क्षमता, अर्शदीपचा स्लॉग ओव्हर मधील प्रभावी मारा या सर्व गोष्टी जरी भारतासाठी पोषक असल्या तरी बाद फेरीत जाताना टीम इंडिया काही समस्याही घेऊन सोबत घेऊन गेला आहे.

Rohit Sharma Hardik Pandya Runs Drought T20 World Cup 2022 Team India Semi Final Challenges
Sania Mirza : सानिया शोएबची नाही पहिली पत्नी; 'तलाक'ही दिला नसल्याने झाला होता वाद

केएल राहुल खरंच फॉर्ममध्ये आला?

भारतासाठी अपयशी सलामी हा सुपर 12 मधील मोठी डोकेदुखी ठरली. भारताला एकाही सामन्यात चांगली सुरूवात करून देता आली नाही. पहिल्या तीन सामन्यात केएल राहुलने खूप निराशा केली. मात्र त्याने बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात सलग दोन अर्धशतकी खेळी करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र केएल राहुलने तुलनेने दुबळ्या अशा बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरूद्ध चांगली खेळी केली आहे. मात्र आता गाठ इंग्लंडशी असल्याने तिथे भारतीय सलामी जोडीची खरी परीक्षा असणार आहे. इंग्लंडकडे तगडा वेगवान मारा करणारे गोलंदाज आहे. इथेच राहुलला आपला खेळ उंचावून 'फक्त दुबळ्या संघाविरूद्ध बेडक्या फुगवतो' हा टॅग पुसून काढण्याची संधी आहे.

रोहित शर्माचा धावांचा दुष्काळ

केएल राहुलने दोन अर्धशतके करून दिलासा दिलाय. मात्र कर्णधार रोहित शर्माला पाच सामने झाले अजूनही फॉर्म सापडलेला नाही. रोहित शर्मा हा असा फलंदाज आहे जो आपला दिवस असेल त्यावेळी एकहाती सामना जिंकून देतो. रोहित यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त धडाकेबाज सलामीवीर नाही तर भारतीय संघाचा कर्णधार देखील आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हा एक काटेरी मुकूट आहे. वर्ल्डकप जिंकण्याचे त्याचावरही मोठे दडपण असणार आहे. मात्र याच दडपणातून संघातील आपली मूळ भुमिका पार पाडणे एका मोठ्या खेळाडूचे चांगल्या कर्णधाराचे लक्षण असते. रोहितने जरी सुपर 12 मध्ये धावा केल्या नसल्या तरी तो मोठ्या सामन्यात कामगिरी करण्यात माहिर आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्ध त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा नक्की करता येईल.

Rohit Sharma Hardik Pandya Runs Drought T20 World Cup 2022 Team India Semi Final Challenges
Sania-Shoaib : स्विमिंगपूलमधील 'त्या' फोटोशूटमुळे सानियाचा संसार मोडणार!

हार्दिक पांड्याचे मोक्याच्या क्षणी बाद होणे

राहुल - रोहितप्रमाणे हार्दिक देखील आपल्या लवकीकास साजेसा खेळ करू शकलेला नाही. आयपीएलमध्ये त्याने आपल्यात कॅप्टन कूल धोनीचे गुण असल्याची झलक दाखवली होती. त्यामुळे टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे टीम कॉम्बिनेशन एकदम तगडे झाले होते. ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजांना पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी गोलंदाजी कराणारा हार्दिक पांड्या भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू ठरतो. हार्दिक गोलंदाजीत आपली भुमिका बजावतोय मात्र त्याला फलंदाजीत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. पाकिस्तानविरूद्ध त्याने 40 धावांची खेळी केली. मात्र सामना फसला असताना तो शेवटच्या षटकात बाद झाला. त्यानंतर त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. ही भारताच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. कारण इंग्लंडविरूद्ध जर भारताची टॉप ऑर्डर ढासळली तर आपल्याला डाव सावरणाऱ्या हार्दिकची नितांत गरज भासणार हे नक्की.

मॅच फिनिशर 'डीके' फिनिश?

हार्दिक पाठोपाठ भारताचा दुसरा मॅच फिनिशर दिनेश कार्तिक देखील आपला जलवा दाखवू शकलेला नाही. त्याला काही सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी देखील मिळाली. मात्र या संधीचा त्याला फायदा उचलता आला नाही. दिनेश कार्तिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा नाही फक्त त्याने 200 ते 250 च्या स्ट्राईक रेटने स्लॉग ओव्हरमध्ये भारताला धावा करून देणे अपेक्षित आहे. मात्र हेच त्याच्याकडून होताना दिसत नाहीये. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ त्याला खेळवणार की नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. मात्र जर संधी मिळाली तर त्याला आपली निवड योग्य होती हे दाखवून देण्याची ही शेवटची संधी असेल.

Rohit Sharma Hardik Pandya Runs Drought T20 World Cup 2022 Team India Semi Final Challenges
Sania-Shoaib Love Story : पहिल्या भेटीत सानियाने शोएबला भावही दिला नाही अन् मग...

अश्विनची संघातील उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच भारताला दुखापतींनी ग्रासले. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकले. यामुळे भारताचे सेट कॉम्बिनेशन हलले. तरी वेगवान गोलंदाजी भारताला आतापर्यंत तरी जसप्रीत बुमराहची फारशी कमतरता भासलेली नाही. मात्र फलंदाजीत लोअर मिडल ऑर्डरमध्ये तसेच मधल्या षटकांमध्ये पार्टर्नशीप तोडणाऱ्या फिरकीपटूची, रविंद्र जडेजाची कमतरता जाणवत आहे. रविचंद्रन अश्विनला त्याच्या फलंदाजी आणि क्रिकेटिंग माईंडमुळे युझवेंद्र चहलपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात आले. मात्र अश्विन गोलंदाजीत आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. याचबरोबर फिल्डिंगमध्येही त्याला मर्यादा असल्याने भारतीय संघासाठी कामगिरी न करणारा अश्विन डोकेदुखी ठरत आहे.

जरी भारत या समस्या घेऊन सेमी फायनलमध्ये पोहचला असला तरी टी 20 हा असा क्रिकेटचा प्रकार आहे की ज्यात एक चेंडू देखील जय पराजयाचे समीकरण बदलून टाकतो. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू भारताच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. आता फक्त इंग्लंडविरूद्ध सर्वांनी एकत्रित योगदान देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.