Rohit Sharma : @100! तब्बल 16 महिन्यांनंतर हिटमॅन पोहचला तिहेरी आकड्यात

Rohit Sharma Century
Rohit Sharma CenturyESAKAL
Updated on

Rohit Sharma Century : भारताचा कर्णधार रोहित शर्माने अखेर आपला शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आक्रमक शतकी खेळी केली. रोहितने 83 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकार ठोकत आपली शतकी खेळी सजवली. रोहितने 123 च्या स्ट्राईक रेटने आपले 30 वे वनडे शतक पूर्ण केले.

रोहित शर्माच्या बॅटमधून तब्बल 16 महिन्यांनी शतकी खेळी केली आहे. त्याने यापूर्वीचे शेवटचे शतक त्याने 2 सप्टेंबर 2021 ला इंग्लंडविरूद्ध ठोकले होते. तर वनडेतील त्याने शेवटचे वनडे शतक हे जानेवारी 2020 मध्ये ठोकले होते.

रोहितने आपले 30 वे वनडे शतक पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत रिकी पॉटिंगला मागे टाकले. आता वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत पहिली तीन नावे भारतीय फलंदाजांचीच आहेत.

Rohit Sharma Century
IND vs NZ 3rd ODI : कॉन्वेचा कडवी झुंज मोडून काढत भारताचा किवींना व्हाईट वॉश; रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवरील पाटा खेळपट्टीवर न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीला पाचरण केले. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सुरूवातीपासूनच चोप देण्यास सुरूवात केली होती.

या दोघांनी 13 व्या षटकातच भारताचे शतक धावफलकावर लावले होते. पहिल्या पॉवर प्लेमध्ये शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत रोहितच्या आधी अर्धशतक पूर्ण केले होते. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात द्विशतकी खेळी करणारा गिल रोहित आधी शतकी खेळी करेल असे वाटत होते.

Rohit Sharma Century
ICC Men's Test Team : ना विराट ना पुजारा लायक फक्त ऋषभ पंतच; ICC ने केली घोषणा...

मात्र रोहितने दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपला गिअर बदलला. त्याने आक्रमक फलंदाजी करत शुभमन गिलच्या आधी आपले शतक पूर्ण केले. या सलामी जोडीने 25 व्या षटकातच भारताच्या 200 धावा पूर्ण केल्या होत्या. 26 व्या षटकात रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर गिलने 6 व्या चेंडूवर आपले शतक 72 व्या चेंडूवर पूर्ण केले.

मात्र 27 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा 85 चेंडूत 101 धावा करून ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. रोहितने गिलच्या साथीने 212 धावांची विक्रमी सलामी दिली.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.