WI vs IND 2nd ODI Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सनी जिंकला. विंडीजने भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारताला हे आव्हान पार करताना आपले 5 फलंदाज गमवावे लागले. आता या मालिकेतील दुसरा सामना हा 29 जुलैला बार्बाडोस येथे होणार आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की विंडीजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील संघात प्रयोग केले जातील. खेळाडूंना संधी दिली जाईल. यामुळे संजू सॅमसनची दुसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची आशा निर्माण झाली आहे.
संजू सॅमसनला प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यासाठी विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात येऊ शकते. संजू सोबतच संघात जयदेव उनडाकटला देखील संधी मिळणार का हा प्रश्न देखील विचारला जात आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी जयदेव उनडाटकला देखील संधी मिळू शकते.
भारतीय वनडे संघातील अनेक महत्वाचे खेळाडू सध्या दुखापतीमुळे संघात नाहीयेत. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला आपली बेंच स्ट्रेंथ कितपत स्ट्राँग आहे हे तपासून घेण्याची संधी आहे. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात याची सुरूवात केली आहे. तो पहिल्या वनडेत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आहे. (Sanju Samson)
विराट कोहली फलंदाजीलाच आला नाही. आता अशी चर्चा सुरू आहे की खेळवून फलंदाजी न देण्यापेक्षा जे खेळाडू वर्ल्डकप संघात असतील की नाही याबाबत शंका आहे त्यांना संधी देण्यात काय हरक आहे.
रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल
विराट कोहली/ संजू सॅमसन
इशान किशन
हार्दिक पांड्या
सूर्यकुमार यादव
रविंद्र जडेजा/अक्षर पटेल
शार्दुल ठाकूर/जयदेव उनाडकट
कुलदीप यादव
उमरान मलिक
मुकेश कुमार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.