Rohit Sharma : वनडेत रोहितचे कर्णधारपद वाचले, मात्र केएल राहुलचे झाले डिमोशन

Team India ODI Squad For Sri Lanka Series
Team India ODI Squad For Sri Lanka Series esakal
Updated on

Team India ODI Squad For Sri Lanka Series : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या जरी टी 20 मधील कॅप्टन्सीला ग्रहण लागले असले तरी त्याची वनडेची कॅप्टन्सी शाबूत राहिली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच भारताचा कर्णधार असणार आहे.

हार्दिकला जरी वनडेची कॅप्टन्सी मिळाली नसली तरी तो कॅप्टन्सीच्या एक पाऊल जवळ जाऊन पोहचला आहे. त्याला वनडे संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. केएल राहुलचे डिमोशन झाले असून त्याला आता संघातील विकेटकिपिंगची अतिरिक्त जबाबदारी देखील सांभाळावी लागणार आहे.

Team India ODI Squad For Sri Lanka Series
केएल राहुल संघातील स्थान अन् उपकर्णधरापदालाही मुकला; श्रीलंकेविरोधात 'अशी' असेल टीम इंडिया

श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. हार्दिक पांड्या रोहितकडून टी20 तसेच वनडेची देखील कॅप्टन्सी काढून घेईल असे वाटले होते. मात्र वनडेमध्ये रोहितला आपली कॅप्टन्सी वाचवण्यात यश आले आहे. मात्र उपकर्णधार केएल राहुलला खराब फॉर्ममुळे आपले उपकर्णधारपद गमावावे लागले. त्याच्या जागा आता हार्दिक पांड्या वनडेचा उपकर्णधार असणार आहे.

Team India ODI Squad For Sri Lanka Series
Hardik Pandya : अखेर तो दिवस उजाडला! टीम इंडियात आता हार्दिक नेतृत्व, अनेक वरिष्ठांना निरोपाचा नारळ

हार्दिक पांड्याचे उपकर्णधारपद हे एका दृष्टीने रोहितसाठी संदेशच आहे. भारताने बांगलादेशमधील वनडे मालिका 2 - 1 ने गमावली होती. हा पराभव बीसीसीआयच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयने वनडे संघात देखील मोठे बदल करण्याचे संकेत दिले होते.

Team India ODI Squad For Sri Lanka Series
Virat Kohli : ठरलं तर मग! विराट कोहली टी 20 मधूनच घेणार ब्रेक; आता IPL 2023...

जरी बीसीसीआयने संघात बदल केला असला तरी नेतृत्व बदलाबाबत सावध भुमिका घेतली आहे. रोहितने जरी आपली कॅप्टन्सी वाचवली असली तरी त्याच्या डोक्यावर हार्दिक पांड्या नावाची टांगती तलवार कायम असणार आहे.

याचबरोबर वनडे संघातून ऋषभ पंत, काळजीवाहू कर्णधार शिखर धवन आणि आर अश्विनचा पत्ता कट झाला आहे. पंत आणि अश्विन कसोटी संघात दिसतील मात्र शिखर धवनला आता टीम इंडियाची दारे कायमची बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.